धामणगाव रेल्वे मतदार संघाचे आमदार प्रताप अडसड यांच्या घरावर”प्रहार” च मशाल आंदोलन

0
17
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

शेतकऱ्यांच्या संपुर्ण कर्ज माफी साठी प्रहार जिल्हाध्यक्ष प्रविण हेंडवे व तालुकाध्यक्ष सुरज गंथडे यांच्या नेतृत्वात धामणगाव रेल्वे विधानसभा क्षेत्रातील आमदार प्रताप अडसर यांच्या घरावर हजारो शेतकरी व कार्यकर्त्यांचा हाती मशाल व भगवा झेंडा आणि गळ्यात निळा दुपट्टा घालत आंदोलन करण्यात आले.

शेतकऱ्यांची संपुर्ण कर्ज माफी, पेरणी ते कापणी पर्यंत ची कामे मनरेगा अंतर्गत घेण्यात यावी, दिव्यांगाना 6000 रूपये मासिक मानधन ईत्यादी मागण्या संदर्भात राज्यभर प्रहार चे आंदोलन करण्यात आले असून युती सरकाने निवडणुकी पुर्वी आपल्या घोषणापत्रात दिलेल्या कर्ज माफी च्या मुद्याने पेट घेतल्याचे दिसून येत आहेत.

प्रवीण हेंडवे अमरावती जिल्हा प्रमुख, सुरज गंथडे धामणगाव रेल्वे तालुकाप्रमुख,दिनेश शेळके नांदगाव खंडेश्वर तालुकाध्यक्ष, निलेश जयसिंगपुरे धामणगाव रेल्वे उपाध्यक्ष, अमर गायधने सचिव, अक्षय धोपटे, शैलेश टाले,अमर ठाकरे, महेंद्र काळे,अनिल भगवे शेखर कांबळे, प्रवीण रोहनकर, गौरव जायले,अंकुश पाटील, विलास कडूकार ,आशिष मानकर, बंडू भोयर,गोपाल राजगिरे, सिद्धार्थ बेंडे अमित देशमुख, निखिल मिसाळ, दिनेश निचत, किशोर जाधव,दीपक पारखंडे, प्रेम कुमार हेडवे, विजय भगत, येशू गावंडे, रामेशोर पवार कुशाल पुसदकर सागर शेंडे अतुल कावळे,मंगेश कडू ,दीपक ठाकरे ,चेतन गावंडे , अमित भेंडे ,प्रतीक हारगोडे,प्रणय रुद्रकार , कुणाल गिरड, कार्तिक घावट, गौरव गावंडे,सागर ठाकरे विशाल डेहणकर गौरव झाडे, महिंद्रा काळे, अंकित राऊत, मयूर माकोडे,शेकडो कार्यकर्ते हजर होते

veer nayak

Google Ad