धामणगाव : श्री दत्त जन्म महोत्सवानिमित्त लूनावत नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात आज दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी आयोजित भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम भक्तीमय वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सकाळी 10.30 वाजता झालेल्या महानैवेद्य आरतीनंतर महाप्रसादाचे वितरण सुरू झाले. दुपारी 3 वाजेपर्यंत हजारो भाविकांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतला. महिला आणि पुरुष सेवेकऱ्यांनी उत्कृष्ट व्यवस्थापन करत संपूर्ण कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडला.
दत्त जयंतीनिमित्त भाविकांच्या मोठ्या सहभागामुळे केंद्र परिसर उत्साह आणि अध्यात्मिक भावनेने उजळून निघाला.
















