धामणगाव रेल्वे : विघ्नहर्ता मित्र मंडळाचा समाजहिताचा आदर्श उपक्रम

0
10
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे येथील विघ्नहर्ता मित्र मंडळ ने सामाजिक बांधिलकी जपत एक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक उत्साह दुप्पट केला आहे. मंडळाच्या युवा कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून गोकुळसरा जिल्हा परिषद शाळेत सर्व विद्यार्थ्यांना दप्तर व कंपास बॉक्सचे वाटप करण्यात आले.

या वाटप सोहळ्यात विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर उमटली, तर पालकांनी मंडळाचे कौतुक करत हा उपक्रम खऱ्या अर्थाने प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

शाळेचे मुख्याध्यापक यांनी मंडळाचे आभार मानत म्हटले की, “विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा आणि त्यांच्या गरजा पूर्ण करणारा हा स्तुत्य उपक्रम इतरांसाठीही आदर्श ठरेल.”

मंडळाच्या या कार्यामुळे परिसरात कौतुकाचा वर्षाव होत असून समाजात सकारात्मकतेचा संदेश गेला आहे. तरुणाईने घेतलेली ही पुढाकाराची जबाबदारी गावोगावी प्रेरणा देणारी ठरत आहे.

veer nayak

Google Ad