आठव्या नॅशनल व्हीलचेअर बास्केटबॉल चॅम्पियनशिप मध्ये महाराष्ट्र वूमन व्हीलचेअर टीम मध्ये धामणगाव रेल्वे तालुक्यातील सावळा गावातील मुलीची निवड.

0
8
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

ग्वालीयर येथे ५ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर होऊ घातलेल्या आठव्या नॅशनल व्हीलचेअर बास्केटबॉल चॅम्पियनशिप मध्ये महाराष्ट्र वूमन व्हीलचेअर टीम मध्ये ११ खेळाडू मध्ये अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील सावळा या छोट्या गावातून गायत्री पुरुषोत्तम उर्कुटकर हिची निवड झाली असून ती महाराष्ट्र वूमन व्हीलचेअर टीम कडून राज्यस्तरीय खळाडू म्हणून खेडणार.

गायत्री ही दिव्यांग असून राष्ट्रीय स्तरावर गावातून सहभाग घेणारी पहिली मुलगी आहे ,गावातून तिचे कौतुक होत असून जिल्हा स्तरावर, आणि तालुक्यातून तिला पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा मिळत आहे.ही चॅम्पियनशिप जिंकून तिने आपल्या राज्याचे तसेच गावांचे नाव मोठे करावे असे आशीर्वाद तिला देण्यात येत आहे.

veer nayak

Google Ad