धामणगाव रेल्वे तालुकास्तरीय धम्म उपासिका शिबिर व समता सैनिक दल शिबिर संपन्न………

0
50
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

       दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा ( पुरुष /महिला) शहर शाखा, ग्रामीण शाखा धामणगाव रेल्वे धामणगाव रेल्वे अंतर्गत दि. 16 जानेवारी ते 25 जानेवारी 2026 पर्यंत 14 ठिकाणी शहरी व ग्रामीण भागामध्ये बुद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या दृष्टीने धम्म उपासिका शिबिर व दिनांक

23 जानेवारी ते 25 जानेवारी 2026 पर्यंत समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही शिबिराचा एकत्रित समारोप व तालुकास्तरीय धम्म मेळावा जीवक बुद्ध विहार पुष्करणा नगर धामणगाव रेल्वे येथे दि. 25 जानेवारी 2026 रविवारला संपन्न झाला.

         सर्वप्रथम समता सैनिक दल धामणगाव रेल्वे यांच्या वतीने जीवन बुद्ध विहार पासून रॅली काढून नगरपरिषद धामणगाव रेल्वे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व सलामी देऊन नंतर जीवक बुद्ध विहार येथे या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

     या धम्म मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून विजयराव लोखंडे तालुका अध्यक्ष धामणगाव, प्रमुख मार्गदर्शक मान. अशोकराव केदारे राष्ट्रीय कार्यालयीन सचिव मुंबई, मान. विजयकुमार जी चोर पगार साहेब राज्य संघटक महाराष्ट्र राज्य, प्रमुख अतिथी प्रा. प्रकाश जी बोरकर जिल्हाध्यक्ष अमरावती पूर्व, मान.प्रा. डॉ. मुकेश जी सरदार जिल्हाध्यक्ष अमरावती पश्चिम, मान. मायाताई धांडे जिल्हाध्यक्ष महिला पूर्व, मान. संगीता ताई सरदार जिल्हाध्यक्ष महिला पश्चिम, मान. राहुल जी गायकवाड तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून मान. गणपतराव तिडके जिल्हा सरचिटणीस, मान. माधुरी ताई चोर पगार जिल्हा उपाध्यक्ष अमरावती, मान. सुनीता ताई हेंडवे तालुका अध्यक्ष महिला धामणगाव रेल्वे तसेच प्रशिक्षक म्हणून मेजर मान. विजयराव हिवराळे, मान. ज्योतीताई धुरंदर अकोला तसेच अमरावती पूर्व व पश्चिमचे संपूर्ण पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

     सदरहू तालुका धम्म मेळाव्याला उपस्थित म्हणून आयु. संजय जी घडी कर, पंकज जी मेंढे, अश्वघोष खोब्रागडे, गौतमजी चोर पगार, रूपचंद जी गुजर, विशाल जी सुटे, रामदास जी हाडे, अशोक जी हेंडवे, प्रदीप गोटे, सुनील मेश्राम, शालिग्राम जी कवाडे तसेच सर्व केंद्रीय शिक्षिका व सर्व पदाधिकारी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा महिला शाखा, जीवक बुद्ध विहार समिती, मैत्रेय बुद्ध विहार समिती या सर्वांनी उपस्थित राहून तालुकास्तरीय धम्म मेळाव्याला तन-मन-धनाने सहकार्य केले. व धम्म मेळावा यशस्वी केला. शेवटी सरणताय गातेने कार्यक्रमा ची सांगता करण्यात आली.

veer nayak

Google Ad