धामणगाव रेल्वे बाजार समितीत विकासकामांचा लोकार्पण सोहळा; आधुनिक शेती आणि शौर्याचा जागर

0
145
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे (प्रतिनिधी):स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिरपेचात आज मानाचा तुरा रोवला गेला. बाजार समितीच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा आणि शेतकरी मार्गदर्शन मेळावा आज, ६ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या थाटात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देतानाच, सामाजिक बांधिलकीचे दर्शनही घडवले.

अमरावती लोकसभा क्षेत्राचे खासदार बळवंत वानखडे यांच्या शुभहस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाचे नूतनीकरण, सुसज्ज भोजनकक्ष, स्वच्छतागृह आणि नवीन लिलाव गृहाचे फित कापून लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रा. विरेंद्र जगताप होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा. जगताप यांनी बाजार समितीच्या प्रगतीचा आढावा घेत, शेतकऱ्यांना सर्व सोयीसुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला. खासदार वानखडे यांनी बाजार समितीच्या पारदर्शक आणि शेतकरीभिमुख कामाचे कौतुक केले.

 

या सोहळ्याचे विशेष महत्त्व म्हणजे, झारखंडच्या घनदाट जंगलात नक्षलवाद्यांशी दोन हात करणारे निधड्या छातीचे कोब्रा कमांडो दिनेश राऊत यांचा यावेळी जाहीर हृदयसत्कार करण्यात आला. त्यांच्या शौर्याचा सन्मान करताना संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमले होते.केवळ बांधकामच नव्हे, तर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे या उद्देशाने दोन विशेष व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. अमरावती येथील प्रख्यात कृषी तज्ज्ञ सुधीरभाऊ जगताप यांनी ‘तूर पीक व्यवस्थापन’ या विषयावर बोलताना खत व्यवस्थापन आणि कीड नियंत्रणाचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर ‘अमृत पॅटर्न’चे जनक अमृतराव देशमुख यांनी कापूस पिकाच्या विक्रमी उत्पादनासाठी आपल्या अनुभवातून शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला आदर्श यशवंत ग्राम झाडाचे शिल्पकार’विजय उगले,अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्रीकांत गावंडे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सौ. कविता श्रीकांत गावंडे, उपसभापती सौ. संगिता संजय गाडे,यांची प्रमुख उपस्थिती होती.मंचावर बाजार समितीचे माजी सभापती रामदास निस्ताने,संजय गाडे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पंकज वानखडे,दत्तापुर खरेदी विक्री सेवा सोसायटी बबनराव मांडवगणे, चांदुर रेल्वे सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष गोविंद देशमुख, चांदुर रेल्वे कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश आरेकर, संचालक रवी भुतडा, डॉ. प्रमोद रोंघे, सौ. चंदाताई निस्ताने, श्री. विपीन ठाकरे, श्री. दिनेश जगताप, श्री. सचिन सोमोसे, सौ. मेघा सबाने, श्री. संदीप दावेदार, श्री. देवराव बमनोटे, श्री. मुकुंद माहोरे, श्री. मंगेश बोबडे, श्री. विलास भिल, श्री. गिरीश भुतडा, श्री. राधेश्याम चांडक आणि श्री. सुनील ठाकरे यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक आडते व्यापारी हमाल मापारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. या विकासकामांमुळे धामणगाव रेल्वे परिसरातील शेतकरी बांधवांची मोठी सोय होणार आहे. कार्यक्रमाचे सुत्र संचालन बबाजार समितीचे सचिव प्रविण वानखडे व आभार प्रदर्शन बाजार समिती संचालक विलास भिल यांनी केले

veer nayak

Google Ad