धामणगाव रेल्वे : माजी आमदार अरुण भाऊ अडसड आणि आमदार प्रताप दादा अडसड यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला

0
45
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

नगरपरिषद निवडणुकीत आज धामणगाव रेल्वे शहरातील नागरिकांसह मान्यवरांनीही उत्साहाने मतदानात सहभाग नोंदवला. माजी आमदार, विदर्भ विकास वैज्ञानिक मंडळाचे माजी अध्यक्ष अरुण भाऊ अडसड तसेच आमदार प्रताप दादा अडसड यांनी सहकुटुंब मतदानाचा पवित्र हक्क बजावून लोकशाहीला बळकटी दिली.

मतदानानंतर ते म्हणाले,

“प्रत्येक नागरिकाने मतदान करून आपल्या शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान द्यावे. लोकशाही मजबूत करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.”

अडसड परिवाराच्या उपस्थितीमुळे मतदान केंद्रावर उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरण दिसून आले. त्यांनी नागरिकांना आवाहन केले—

“मतदान करा, शहराच्या विकासासाठी योग्य नेतृत्व स्वतः निवडा.”

veer nayak

Google Ad