धामणगाव रेल्वे येते कराटे खेळाडूंना बेल्ट, प्रमाणपत्र वितरीत.

0
19
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

ता. प्रतिनिधी/  धामनगाव रेल्वे : बोधी बुडोकान

कराटे असोसिएशन ऑफ इंडिया अंतर्गत धामणगाव रेल्वे येथे आयोजित कराटे बेल्ट परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत उत्तीर्ण खेळाडूंना बेल्ट व प्रमाणपत्र वितरण सोहळा नुकताच कराटे प्रशिक्षण स्थळ आरोही हॉल येथे उत्साहात पार पडला. यावेळी यशस्वी खेळाडूंना बेल्ट व प्रमाणपत्र देण्यात आले 

तालुक्यात कराटे संस्कृती रुजवून तरुणांमध्ये आत्मरक्षण व मुला मुलींना स्वतःचा संरक्षण कसे करावे त्यासाठी कराटे प्रशिक्षण धामणगाव रेल्वे मध्ये देत आहे , बोधी बुडोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया संयुक्त विद्यमानाने 05 जानेवारी 2025 रविवार रोजी सकाळी 8 ते 5 वाजे पर्यंत कराटे प्रशिक्षण व बेल्ट परीक्षा घेण्यात आले व कराटे बेल्ट

येलो, ऑरेंज, ग्रीन, ब्ल्यू ,पर्पल व ब्राऊन बेल्ट परीक्षा घेण्यात आले. या परीक्षेसाठी मुख्य परीक्षक तेलंगणा येतील आदिलाबादचे पोलिस अधिकारी मुकेश कांबळे, यांच्यासह मास्टर आकाश पवार , मास्टर संध्या पवार, मास्टर अनुषका, मास्टर अंगरिष ब्लैक बेल्ट यांची उपस्थिती होती. बोधी बुडोकान कराटे असोसिएशन महाराष्ट्र

अध्यक्ष सचिन मून ब्लॅक बेल्ट हे मुख्य प्रशिक्षक व सचिन चौधरी व केअरटेकर हे देखील यावेळी परीक्षक म्हणून उपस्थित. 

होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सामजिक कार्यकर्ता राधाजी भूत, नीरजा मॅडम, भंते धम्मसार , श्री निवास सर, अरूण दोंगरदिवे (पत्रकार) यांची प्रामुख्याने उपस्थिती होते. व केअरटेकर सचिन चौधरी यांचा ट्रॉफी व मेडल देऊन सन्मान करून यावेळी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्याच्या हस्ते वेल्ट व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. संचालन सचिन मून यांनी केले. तर उपस्थितांचे आभार सम्यक दहाट यांनी मानले.

या कार्यक्रमाला ब्लॅक बेल्ट सोनाली गुप्ता , सम्यक दहाट, प्रणय डोंगरे नव्या, खुशी, व पालकांची उपस्थिती होते..

veer nayak

Google Ad