स्वर्गीय दिगांबर बाजीराव कडू यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गेल्या १५ वर्षांपासून अशोक नगर येथे बालगोपाळांसाठी तान्हा पोळ्याचे आयोजन सरपंच सौ. स्नेहल मनोज कडू यांच्या पुढाकाराने केले जाते. त्यानुसार यावर्षी सुद्धा श्रीछत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तान्हा पोळा उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षपद सौ. मंदाकिनी दिगांबरराव कडू यांनी भूषविले तर प्रमुख अतिथी म्हणून धामणगाव रेल्वे तहसीलदार श्री. अभय घोरपडे उपस्थित होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज कडू, खरेदी-विक्री संघाचे संचालक हेमंत कडू, माजी सरपंच अरुणभाऊ उभाड, भाजप तालुकाध्यक्ष प्रणय राजनकर, पोलीस पाटील नरेश कडू, ग्रामपंचायत सदस्य सौ. रेखाताई साठवणे, सौ. मनीषाताई ठाकरे, माजी सदस्य अनिल राजनकर, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष दिनेश कडू, डॉ. रमेश पूनसे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक व महिला उपस्थित होते.
बालगोपाळांनी मातीचे सुंदर बैल सजवून शेतकऱ्याच्या जीवनमानावर आधारीत देखावे सादर केले. सर्व स्पर्धकांना सहभाग बक्षिसे देण्यात आली.
प्रथम पारितोषिक : नैतिक प्रमोदराव सहारे
द्वितीय पारितोषिक : अथर्व राहुलराव कडू
तृतीय पारितोषिक : श्रद्धा राजेशराव शेंडे
चौथे पारितोषिक : सृष्टी नीलेशराव कडू
प्रोत्साहनपर बक्षिसे हिताक्षी शेंडे, स्वरा शेंडे, आर्या देव्हारे, जुही कडू, निशा हटवार, श्वेता भजभुजे यांनी पटकावली.
कार्यक्रमात गावातील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला.
दहावीचे गुणवंत : भाग्यश्री शेलोकार, सार्थक घोडे, मोहित कडू, स्नेहदिप राजनक
बारावीचे गुणवंत : ऋषिकेश थोटे, कल्याणी थोटे
तान्हा पोळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी मुरलीधर नागपुरे, सुशील कडू, प्रणय पूनसे, सुकेश कडू, गौरव ठाकरे, नवचंद्र ठाकरे, प्रकाश पूनसे, सुरज आमले, शुभम जुनघरे, प्रमोद सहारे, संजय सहारे, संजय राऊत, अमोल शेलोकार, राहुल कडू, प्रणय कडू, तन्मय कडू, सुजन कडू यांनी विशेष प्रयत्न केले.
हा तान्हा पोळा कार्यक्रम गावाच्या ऐक्याचे व परंपरेचे प्रतीक ठरला. ✨