श्री परशुराम महिला सेवा समिती व श्री परशुराम सेवा समिती चे आयोजन.
धामणगाव रेल्वे,
श्री परशुराम महिला सेवा समिती व श्री परशुराम सेवा समिती यांच्या वतीने धामणगावात रेल्वे येथे शुक्रवारी निघालेल्या रामदेव बाबांच्या ध्वज व शोभा यात्रेने शेकडो महिला पुरुषांच्या हातात असलेल्या रामदेव बाबांच्या ध्वजांमुळे संपूर्ण धामणगाव नगरी आध्यात्मिक आणि
श्री रामदेवबाबा मय झाल्याचे भासत होते. येथे रामदेव बाबा यांच्या जीवनावरील अमृत कथा महोत्सवाचे आयोजन दिनांक २५ ते २७ जुलै या तीन दिवसांत करण्यात आलेले आहे या निमित्य शुक्रवारी सकाळी श्री रामदेव बाबा मंदिर, अमर शहीद भगतसिंग चौक, येथून भव्य ध्वज यात्रा व शोभायात्रा चे आयोजन करण्यात आले शेकडो महिला पुरुषांच्या उपस्थिती निघालेली ध्वजा यात्रा श्री रामदेव बाबा मंदिर अमर शहीद भगतसिंग चौक, माहेश्वरी भवन, गांधी चौक, सिनेमा चौक, टिळक चौक, शास्त्री चौक वरून श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील आरोही रिसोर्ट पर्यंत काढण्यात आली
धामणगाव नगरीत मार्गक्रमण होताना प्रत्येक चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले ठीक ठिकाणी थंड पेय व चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली.
कथा वाचन कोलकाता येथील संत जयप्रकाश महाराज यांच्या वाणीतून होणार आहे. दररोज दुपारी २ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आरोही रिसोर्ट, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हा कार्यक्रम होणार आहे कथेमध्ये आज दुसऱ्या दिवशी बाबांचा लीला उत्सव तसेच रविवार २७ जुलैला बाबांचा ब्यावला उत्सव होणार आहे.
धामणगाव पहिल्यांदाच होणाऱ्या या श्री रामदेव बाबांच्या भव्य कथा आयोजनामध्ये कथा श्रवण करण्याची विनंती श्री परशुराम महिला सेवा समिती व श्री परशुराम सेवा समिती यांनी केलेली आहे