धामणगाव कृषी उत्पन्न बाजार समिती वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

0
103
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सन 2023 -24 या आर्थिक वर्षाची सर्वसाधारण सभा (आमसभा) दिनांक 14 सप्टेंबर 2024 रोजी बाजार समितीचे श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहांमध्ये उत्साहात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्ष स्थानी सभापती सौ कविता श्रीकांत गावंडे होत्या. विशेष आमंत्रित म्हणून मा. श्री विजयराव उगले उपाध्यक्ष जवाहर सहकारी सूतगिरणी तथा अध्यक्ष सेवा सहकारी संस्था आष्टा /झाडा होते. महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन करून सभेत उपस्थित सर्व माजी सभापती व उपसभापती यांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. सभापती सौ कविता श्रीकांत गावंडे यांचे प्रास्ताविकाने सभेस सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी विशेष आमंत्रित म्हणून मा. श्री बबनरावजी मांडवगणे ,अध्यक्ष खरेदी विक्री संघ धामणगाव, माजी सभापती श्री श्रीकांत गावंडे संचालक अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, माजी सभापती श्री रामदासजी निस्ताने ,माजी उपसभापती श्री भीमरावजी देशमुख यांचा सत्कार करण्यात आला .

सभेत धामणगाव तालुक्यातील सरपंच, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष , आडते, व्यापारी , हमाल ,मापारी व प्रतिष्ठित नागरिक आवर्जून उपस्थित होते.

मा. श्री विजयराव उगले यांनी सभापती ,उपसभापती व सर्व संचालक मंडळाचे विकासाभिमुख कामाचे कौतुक केले. संचालक मंडळाने मागील वर्षीच्या आमसभेत दिलेल्या वचनांची पूर्तता केल्याचे स्पष्ट केले. सर्वे नंबर 20 परसोडी रोड वरील शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधकाम, भावनाचे नूतनीकरण ,लिलाव शेड ,संरक्षक भिंत ,स्वतंत्र स्वच्छता गृह, अंजनशिंगी येथील शिदोरी गृहाचे नूतनीकरण इत्यादी कामाची वर्क ऑर्डर झाल्याने समाधान व्यक्त केले.

श्री प्रशांत सबाने ,अध्यक्ष सेवा सहकारी संस्था दिघी महल्ले यांनी मागील सभेत विनंती केली होती की , शिवाजी महाराजांचा पुतळा यार्डवर बसविण्यात यावा त्याचे काय झाले? यावर सभापती सौ गावंडे यांनी माहिती सादर केली की, सदरचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे

श्री सुरेंद्र जयस्वाल अध्यक्ष सेवा सहकारी संस्था सावळा यांनी मनोगत व्यक्त केले की अहवाल वर्षात उत्पन्नामध्ये विक्रमी वाढ झाली आहे तसेच समितीने शेतकरी भोजन व्यवस्था पूर्वत नव्याने सुरू केली मुख्यालयाचे प्रवेशद्वार सुशोभीकरण केले ,तीळ व ज्वारीचा लीला सुरू केले ,वॉटर फिल्टर प्लांट बसविण्यात आला, नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकरी कुटुंबातील व्यक्तींना वीज पडून किंवा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाल्यास समितीकडून मृताचे कुटुंबास एकवीस हजार रुपयांची तत्काळ मदत देण्याचा स्वागताहर्य निर्णय घेतल्यामुळे सभेत अभिनंदनचा प्रस्ताव मांडला सदर प्रस्तावास श्री विजयराव उगले यांनी अनुमोदन दिले आभार प्रदर्शन श्री मंगेश बोबडे उपसभापती यांनी केले.

सदर कार्यक्रमाचे यशस्वीते करिता सर्व संचालक मंडळ सचिव कर्मचारी यांनी परिश्रम घेतले

veer nayak

Google Ad