अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील एकदरा येथील अतिप्राचीन पुरातन ऐतिहासिक जगदंबा पार्वती माता मंदिर आहे अति प्राचीन काळापासून पंचक्रोशीत नव्हे तर जिल्ह्यात व विदर्भातही ओळखले जाते हेच तिर्थस्थान भाविकांचे श्रद्धास्थान भक्त संकटात सापडला तर हाकेला धावून जाणारी स्वयभू जगदंबा पार्वती माता धावून येते असी भक्तांची श्रद्धा आहे भक्तांच्या हाकेला व नवसाला पावणारी व संकटात तारणारी माता शेकडो वर्षांपूर्वी अतिप्राचीन काळात गावा शेजारी एका शेतकऱ्याच्या शेतात विहीर खोदकाम करीत असताना रक्ताची चिंगारी उडताना दिसताच येथे रक्ताची चिंगारी कशाची आहेत याचा शोध घेतला असता लिंग स्वरूपात मुर्ती आढळून आली तिच लिंग स्वरूपात स्वयंभू साक्षात तिच मूर्ती साक्षात आजही मंदिराच्या गाभाऱ्यात स्थित आहेत मुर्तीच्या बाजुलाच छोटेसे बाहुली तिर्थकुड आहे.
त्या तिर्थकुडातील तिर्थाचे फार मोठे महत्व सागण्यात येते त्याच गाभाऱ्यात काही कालांतराने पुर्ण शरीराचे अवयव अलग अलग करून अष्टांग सिध्द योग साधनारे अजपाल महाराज होऊन गेले असे पुरातन इतिहासा नुसार सांगण्यात येते आजही जोकोनी भक्त श्रध्दा भावाने नतमस्तक होतो त्याची मनोकामना पूर्ण होतात असी येथे पंचक्रोशीतील दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची प्रत्यक्ष अनुभूती आहे दरवर्षीला शारदीय नवरात्रौत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्यामंधे ह भ प एकनाथ महाराज ्अचलपूर यांचें देवी भागवत पारायण गर्भा नृत्य गावातील व बाहेरुन येणाऱ्या मंडळाचे भजने असे विविध कार्यक्रम साजरे करण्यात येतात व रात्री पहाटे तिन वाजता पासुन पंचक्रोशीतील भाविकांचा फार मोठ्या प्रमाणात जनसागर लोटतो असी निसर्गरम्य परिसरातील शोभा अवर्णनीय आहे तरी बाहेरुन येणाऱ्या भाविकांनी शांततेत दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन एकदारा ग्रामस्थ व संस्थेच्या विश्वस्तांन कडुन केल्या जात आहेत.