सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून जीवनाचा विकास – नितीन टाले

0
44
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून जीवनाचा विकास साधता येतो. महाराजांनी दिलेली ग्रामगीता हा अमूल्य ग्रंथ ठेवा आहे हा सर्वांनी आपल्या घरोघरी वाचन केले पाहिजे तेव्हाच महाराजांचे विचार साध्य होईल असे मत नितीन टाले यांनी दाभाडा येथे महादेव बाबा जयंती उत्सवानिमित्ताने सामुदायिक प्रार्थना या विषयावर बोलताना मांडले .
सामुदायिक प्रार्थना सामुदायिक ध्यान व हरिपाठ यासारखे कार्यक्रम गेल्या चार दिवसापासून दाभाडा येथे केल्या जाते आहे. यामध्ये अनेक मान्यवर मंडळींना मार्गदर्शन करण्याकरिता बोलावण्यात येत आहे सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेला मोठ्या प्रमाणात भाविक हजर असतात त्यानिमित्ताने अनेक वैचारिक विचार मांडण्यासाठी परिसरातील काही विचारवंतांना यावेळी आमंत्रित करण्यात येते.
महादेव बाबा यांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो आहे या दाभाडा येथील नागरिकच नव्हे तर परिसरातील भाविक सुद्धा मोठ्या प्रमाणात या सामुदायिक प्रार्थना व सामुदायिक ध्यानाला हजर असतात.
या सामुदायिक प्रार्थनेच्या वेळेला गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात हजर होते त्याचप्रमाणे लहान मुलं मुली सुद्धा त्यावेळी उपस्थित होते.

veer nayak

Google Ad