अमरावती जिल्ह्यात चांदुर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा विठोबा येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थानचे “गौरक्षण” मधील देव-गाईला दि.१७/६/२०२४ सोमवारला देवाज्ञा झाली असून संस्थानचे वतीने या देव-गाईला दि.१८/६/२०२४ मंगळवारला सकाळी ८.०० वाजता खड्डा खोदून संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम वैतागराव नेमाडे यांचे हस्ते देव- गायीची पूजा करून संस्थानचे गलपामध्ये संपूर्ण विधिवत अंत्यविधी करून माती देण्यात आली.
या वेळी संस्थानचे विश्वस्त विनायकराव पाटील, फुलसिंगजी राठोड, चरणदासजी कांडलकर, लक्ष्मण राठोड, संस्थानचे कर्मचारी उत्तम चौधरी, प्रेमदास जाधव,रवी खत्री*, संस्थानचे गौरक्षण कर्मचारी सहारे,साहेबराव चौधरी*, जे.सी.बी.मालक शामभाऊ नांदुरकर आणि संचालक चमू व इतर गावकरी मंडळी यांची या अंत्यसंस्काराला प्रामुख्याने उपस्थिती होती, या वेळी महाराजांची आरती म्हणून “भावपूर्ण श्रद्धांजली” अर्पण करण्यात आली