उपायुक्त माधुरी मडावी यांनी धरला काँग्रेसचा हात. स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून राजकारणात प्रवेश

0
41
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अमरावती महानगरपालिकेच्या उपायुक्तपदाचा पदभार काही दिवसांपूर्वी स्वीकारलेल्या माधुरी मडावी यांनी अचानकपणे आपल्या पदावरून निवृत्त होऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.नुकताच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असुन महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्या गडचिरोलीतून काँग्रेसच्या विधानसभेच्या उमेदवार असू शकतात.
मुंबई येथील महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश करण्यात आला असून त्यांची प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली.


दिग्रस येथे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या माधुरी मडावी यांची नुकतीच अमरावती येथे बदली झाली होती.अशा स्थितीत राजकीय हस्तक्षेपामुळे त्यांची वारंवार बदली करण्यात येत होती. दिग्रस येथे रुजू होण्यापूर्वी त्यांना यवतमाळ यवतमाळच्या नगरपरिषद मुख्याधिकारी पदावरून अमरावती येथे उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली होती त्यावेळी यवतमाळ येथे वादग्रस्त असलेल्या तत्कालीन मुख्याधिकारी यांच्या व माधुरी मडावी यांच्यामध्ये चांगलाच वादंग निर्माण झाला होता. त्यांनी मॅटकडे ही दाद मागितली होती. मात्र अचानक याचिका मागे घेत त्यांनी अमरावती महापालिकेत उपायुक्तपद स्वीकारले.नियुक्तीनंतर काही दिवसांतच त्यांनी आपल्या कार्यशैलीची चांगलीच छाप सोडली होती.शहराच्या स्वच्छतेसाठी
दबंग महिला अधिकारी म्हणून त्यांनी यवतमाळ व दिग्रस येथे चांगली कामे केल्याने त्यांच्यासोबत जनाधार होता तसेच राजकीय हस्तक्षेपाने यवतमाळ हुन बदली केल्यानंतर यवतमाळकरांनी या विरोधात आंदोलनही पुकारले होते.
त्यांनी चालवलेला बुलडोझर अनेक वर्षांपासून नाल्यांवर अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांना मारक ठरला होता.सदैव तत्पर असलेल्या आणि स्वतःच्या अधिकाऱ्यांवर थेट कारवाई करणाऱ्या मडावी यांनी स्वच्छता विभागात अनेक बदल केले.
पण गेल्या २० दिवसांपासून त्या अचानक रजेवर गेल्या होत्या. १२ जुलै रोजी पदभार स्वीकारलेल्या माधुरी मडावी १ सप्टेंबर रोजी वैद्यकीय रजेवर गेल्या होत्या. जी त्यांनी १४ सप्टेंबरपर्यंत वाढवली. यावेळी त्यांनी नगरविकास विभागात स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केल्याची माहितीही समोर आली.अशा स्थितीत त्यांचा पदभार पुन्हा एकदा महापालिकेत उपायुक्त पदावर आलेल्या अनघा वासनकर यांच्याकडे सोपवण्यात आला. त्या मुंबईत असल्याची माहिती असताना अचानक त्यांच्या काँग्रेस प्रवेश काही चित्रे समोर आली होती.यावरुन तर्क वितर्क लावल्या गेले मात्र अखेर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्विकारुन काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचा शिक्कामोर्तब झाला

veer nayak

Google Ad