घुईखेड ते पंढरपुर पायदळ वारीचे प्रस्थान. संत बेंडोजी बाबा पालखीची १३५ वर्षांची परंपरा. २१ जुलै ला पंढरपुरला पोहोचणार

0
86
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चांदुर रेल्वे – (ता. प्र. )

आषाढी वारी ही एक मोठी वारी आहे. आषाढी एकादशी पायदळ वारीेचे आयोजन चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील श्री. बेंडोजी बाबा संस्थानतर्फे करण्यात आले असुन ही वारी चालत, वाजत, गाजत, भजन, कीर्तन, भारूड करत ऊन अंगावर फुले झेलल्यासारखी झेलत पंढरीसाठी शेकडो भाविकांसह मंगळवारी (ता. ४) रवाना झाली. ही दिंडी २१ जुलै ला पंढरपुर येथे पोहोचणार आहे.

यामध्ये सर्वप्रथम श्री. बेंडोजी महाराज यांच्या पादुकांचे जलाभिषेक मंदिराचे ट्रस्टी विश्वस्त प्रविण घुईखेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. तर पुजन तळेगाव दशासरचे ठाणेदार रामेश्वर धोंडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुरूषोत्तम महाराज तायडे, सारंग महाराज ढोरे, केशवानंद महाराज चवरे, प्रथमेश महाराज गिरी, तळेगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी विजयसिंह बगेल, सचिन गायधने, विनोद राठोड, अंकुश पाटील व महिला पोलीस काळमेघ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. त्यानंतर नित्य- नियमानुसार गावातील चंद्रभागा नदीकडे दिंडी प्रस्थान करीता मार्गस्त झाले. लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले श्री. संत बेंडोजी महाराज (संजीवनी समाधी) यांच्या ४७ दिवसाच्या पायी दिंडीमध्ये घुईखेडसह आजुबाजुच्या गावांतील भाविक घरदार, संसार, सुख-दु:ख, दुखणे, आजारपण सर्व विसरून सामील झाले. शेकडो वारकरी कोणाच्याही पत्राची, आमंत्रणाची वाट न पाहता सर्व कामे बाजूला ठेवून किंवा पूर्ण करून वारीला निघण्यास तयार झाले होते. कशाचीही काळजी, चिंता न बाळगता सर्व त्या माउलीवर सोपवून आषाढ महिन्यात तयार होऊन निघाले. भाविक घुईखेड येथुन प्रस्थानापासून ते पंढरीपर्यंत चालत सतत त्या माउलीचे नाव घेत भजन, कीर्तन करत वारीत सामील झाले. अगदी मोकळ हवेतून चालत, घाटातून चालत, मोकळ रानातून, दाट झाडीतून, मजल दरमजल करत भाविक निघाले. निसर्गाचा पुरेपूर आनंद वारीत सतत घेतात. नवीन माणसे, नवीन ओळखी, नव कला अनुभवाला मिळतात. भाविकांच्या संपूर्ण शरीराची या वारीमुळे सर्व्हिसिंग होते.

श्री. संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यातील श्री. ज्ञानेश्वर माऊली रथामागील एकुण २१ मानाच्या दिंड्यापैकी मानाची दिंडी म्हणुन श्री. संत बेंडोजी महाराज संस्थान, घुईखेडच्या दिंडीचा १७ वा क्रमांक आहे. व या रथामागे विदर्भ प्रांतातुन जाणारी घुईखेड येथील एकमेव दिंडी आहे. श्री. संत बेंडोजी महाराज संस्थान हे १३३७ चे असुन सदर वास्तु ही अतिशय प्राचीन असल्याचा इतिहास दर्शवितो. या पायी दिंडी सोहळ्याची वारकरी संप्रदायाची परंपरा ही एकुन १३५ वर्षांपासुन चालत आलेली आहे. तसेच २१ व्या शतकामध्येही पायी दिंडी सोहळ्याची प्रथा आजही अविरतपणे यशस्वापणे पार पडत आहे. ४ जुन रोजी घुईखेड वरून निघालेली दिंडी १७ जुन रोजी पैठण येथे पोहोचणार आहे. तर १८ जुन रोजी श्री क्षेत्र पैठण येथून दिंडीचे प्रस्थान होणार असुन २८ जुन रोजी आळंदी येथे पोहोचणार आहे. तर २९ जुन रोजी आळंदी येथून दिंडीचे प्रस्थान होणार असुन २१ जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचणार आहे. या दरम्यान अनेक गावात दिंडीच्या थांबण्याची, नाश्ता, चहा व जेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. २२ जुलै रोजी विनेकरांचे पंढरपूर काल्यानंतर दिंडी परतीच्या प्रवासात आळंदीकडे रवाना होणार आहे. या सोहळ्यामध्ये नंदकिशोर काकडे, संजय काकडे, राजाभाऊ चौधरी, प्रशांत घुईखेडकर, दादाराव क्षिरसागर, पांडुरंग भोयर, विश्वेश्वर गावंडे, घड्डीनकर महाराज, कुणाल सिंगलवार, प्रतीक येवले, प्रफुल चनेकार, शरद गुल्हाने, लखपती मेश्राम, किशोर येवले, अभिजीत काकडे, मुकुंद काकडे, गजानन फिस्के, उत्तम गावंडे, यशवंत काकडे, अनिल शेंडे, मधु बोबडे, संजय चनेकार, निकेश लाड, कैलास सावनकर, बबन कोठाळे, बालू मिर्चापुरे यांच्यासह परिसरातील शेकडो भाविक भक्त सहभागी झाले होते.

९१० कि.मी. चा पायदळ प्रवास

घुईखेड ते पंढरपूर असा एकुण तब्बल ९१० किलोमीटरचा पायदळ प्रवास ही वारी करणार आहे. तर विनेकरी सोबत आळंदी चा २६० कि.मी. चा वेगळा पायदळ प्रवास सुध्दा होणार आहे.

veer nayak

Google Ad