धामणगाव रेल्वे | प्रतिनिधी
धामणगाव रेल्वे येथील हिरापूर मारुती मंदिर परिसरात महान समाजसुधारक, कीर्तनकार व कर्मयोगी राष्ट्रसंत संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम भक्तिमय व सामाजिक एकतेच्या वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे आयोजन धोबी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. समाजातील विविध मान्यवरांनी उपस्थित राहून गाडगेबाबांच्या विचारांना अभिवादन केले. स्वच्छता, सामाजिक समता, शिक्षण व श्रमप्रतिष्ठा यांचे महत्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून नवीनभाऊ कनोजिया, पंकज क्षिरसागर, जयवंत भालेकर, विजुभाऊ काळे, श्रीकांतजी शेन्डे, मनोजभाऊ धोटे, मदन भिलकर, विलासभाऊ दळवी, दत्ता कडुकार, संजय क्षीरसागर, अवधूत तायवाडे, अमोल तायवाडे, राजू तायवाडे व गजानन तायवाडे आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.…

















