धामणगाव तालुक्यातील वाघोली शिवारात शेतातील काम करत असताना कॅनलच्या पाटसरीत पडून एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. दिनेश दीपक मरकाम (वय ३२, रा. जळगाव) असे मृत युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश मरकाम हे वाघोली शिवारातील आपल्या सामूहिक शेतात गव्हाला वलीत करण्यासाठी गेले होते. हे शेत सूतगिरणीला लागून मेन रोडलगत आहे. काम करत असताना त्यांना अचानक फिट (अपस्माराचा झटका) आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यावेळी तोल जाऊन ते कॅनलच्या पाटसरीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे जळगाव व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास संबंधित यंत्रणेकडून सुरू असल्याची माहिती आहे.















