धामणगाव रेल्वे तालुक्यातील गव्हाणी पाणी येथील रोशन हनुमंत नवघरे व वायगाव निपाणी येथील गायत्री गणेशराव हागे हे दोन्हीही मुलगा मुलगी मूक बधिर आज धामणगाव येथील पसारी धर्म शाळेमध्ये विवाह बंधनात अडकले. या दोघांनाही ऐकायला आणि बोलता येत नाही दोघेही मूकबधिर आहे. रोशनचे शिक्षण दहावीपर्यंत झालेले आहे मुलीचे सुद्धा बारावीपर्यंत मूकबधिर विद्यालयातच शिक्षण झालेले आहे.
रोशनला मात्र मूकबधिर असला तरी कुठले प्रकारचे नोकरी लागलेले नाही मात्र नोकरीच्या शोधामध्ये अजून आहे आपल्या घरी शेती असून त्या शेती मधून मोठ्या प्रमाणात उत्पन्न काढून आपला संसाराचा गाडा चालवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. गेल्या काही दिवसापासून विवाह करण्याची मनामध्ये इच्छा प्रकट केली आणि आई-वडिलांना ती इच्छा त्यांनी सांगितले आणि आई-वडिलांनी मुलगी बघणे शोधा शोध सुरू केला परंतु आपला मुलगा मूकबधिर असल्यामुळे या प्रश्नाने आई-वडिलांच्या मनामध्ये घर केले परंतु संसाराच्या रेशीमगाठी ह्या रोशनला त्याच्याप्रमाणेच मुलगी मिळाल्याने या दोघांनी विवाह करण्याची इच्छा अधिक प्रबळ केली आणि आज धामणगाव रेल्वे येथे त्यांचा विवाह संपन्न झाला. या विवाह सोहळ्यामध्ये रोशनचे शाळकरी मित्र तसेच गायत्री चे मित्र मैत्रिणी सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. वर्धा अमरावती यवतमाळ चंद्रपूर नागपूर या जिल्ह्यामधून आलेले मित्र-मैत्रिणी हे यांच्या विवाह सोहळ्यामध्ये विशेष आकर्षण ठरले असल्याचे आज दिसून आले. विवाह सोहळा सुरू असतानाच आपले मित्र मंडळी हे बोलत असताना नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते आणि त्याबद्दल कुतूहल सुद्धा वाटत होते. त्यांना बोलता येत नाही परंतु त्यांच्या त्यांच्या सांकेतिक भाषेनुसार ते हावभाव करत होते हे मात्र कुत्वालाचा विषय ठरला गेला.
याआधी गेल्या महिन्यामध्ये कावली येथे सुद्धा मूकबधिरांचा विवाह आता पंधरा दिवसाच्या आत मध्येच हा दुसरा विवाह सोहळा धामणगाव रेल्वे मध्ये संपन्न झाल्याने धामणगाव रेल्वे तालुका विशेष लक्षवेधी ठरत आहे. या नवदांपत्यांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी अनेक मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होते. त्याचप्रमाणे त्यांचे पाहुणे मंडळी सुद्धा मोठ्या प्रमाणात हिरे हिरे ने भाग घेत होती. या मूकबधिर जोडप्यांना शासनातर्फे काही विशेष योजनेचा लाभ मिळावा यासाठी सुद्धा संबंधित प्रतिनिधींनी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावे अशी चर्चा या विवाह सोहळ्यात.