या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये उद्यमशील मानसिकता आणि जीवन कौशल्ये विकसित करणे आहे.या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भविष्यात उच्च शिक्षण घेण्यासाठी , नोकरी करण्यासाठी आणि व्यवसाय करण्यासाठी आवश्यक जीवन कौशल्ये जसे आत्मविश्वास , स्वजाणीव संवाद कौशल्ये , सहकार्य ,स्वत्रंत विचार , नवीन गोष्टी शिकणे ,सर्जनशील विचारशक्ती आणि चिकित्सक विचार असे शिकविल्या जातात. शाळा स्तरीय प्रदर्शनी मध्ये विद्यार्थ्यांनी ३ P ( व्यक्ती , पर्यावरण आणि नफा ) संकल्पेचा वापर करून वेगवेगळे व्यावसायिक प्रकल्प तयार केले होते त्यामध्ये नैसर्गिक साबून , बॉडीलोशन, निमतेल ,परफ्युम , जुन्या कापडापासून ड्रेस, पायपुसणी बनवणे , रेझीम आर्ट, हस्तकलेतून चित्र रेखणे आणि त्याची फोटोफ्रेम , चॉकलेट असे विविध उत्पादनाची विक्री विद्यार्थिनींनी प्रदर्शनी मध्ये केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ.सुनिता देशपांडे मॅडम, प्रमुख अतिथी उद्यम लर्निग फौंडेशन या संस्थेचे कु. अवनी मेवाळा मॅडम(प्रकल्प व्यवस्थापक महाराष्ट्र), श्री.मंगेश काटेखाये सर ,रोशन गोटे सर ,विनोद निंबोळकर सर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन ,सरस्वती पूजन आणि प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी कु. अवनी मेवाळा यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय मुख्याध्यापिका मॅडम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. सक्षम कार्यक्रमाचा उद्देश श्री. ईश्वरदास बागडे सर यांनी सांगितला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्री अनुप चरपे सर यांनी केले तसेच शाळेचे इतर शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी विद्यार्थिनींचे खूप खूप कौतुक केले.