प्रतिनिधी दर्यापूर – सद्यस्थितीत शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असतांनाच मध्यरात्री ठिक-ठिकाणच्या घरासमोरील रस्त्यावर उभ्या असलेल्या 5 कारची अज्ञांताकडून तोडफोड करण्यात आली आहे. सदर प्रकार हा बुधवार (दि.20 ) सकाळी उघडकीस आला आहे. या घटनानमुळे नगरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीसांनी रात्रगस्तं वाढविण्याची मागणी जोर धरत आहे.
दर्यापूर-मुर्तीजापूर रोडस्थीत गजानन काँलनी येथील रविंद्र ढोकणे,सचीन रहाटे,गुड्डू चंदेल तर अवधूत नगरमधील वीजय इगळे व पंजाबराव काँलनीतील अन्य एक कार अशा एकूण पाच कारच्या काचांची तोडफोड रात्रीच्या सुमारास अज्ञातांनकडून करण्यात आली आहे. या तोडफोडीच्या घटनानमुळे त्या-त्या कारमालकांचे मोठे नुकसान झालेले आहे. याप्रकरणी काहींनी पोलीसात तक्रार दिली आहे. मागील आठवड्यातही दोन तीन वाहनांच्या काचा फोडण्यात आल्याचेंंही नागरिकांकडून सांगण्यात आले.
बाँक्स – शहरातील ठिकठिकाणच्या चारचाकी वाहनांची तोडफोड झाल्या प्रकरणी एका जणास ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेला ईसम हा माथेफिरू असून वुत्तलिहीस्तोवर पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहीती दर्यापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष ताले यांनी दिली.