गावातील ग्रामदैवत संत महादेव बाबा यांची पुण्यतिथी मोठ्या भक्तिभावात सुरू झाली आहे.
काल दिनांक २२ सप्टेंबर रोजी तीर्थ स्थापना सोहळा पार पडला. तर आज दिनांक २३ सप्टेंबर रोजी दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. यात शेकडो भाविकांनी उत्साहाने सहभाग घेतला.
मंदिर परिसर फुलांनी सजविण्यात आला असून गावात भक्तीमय वातावरण अनुभवायला मिळत आहेत
आज सहा वाजता निघणार संत महादेव बाबांची पालखी
गुरुदेव भजन मंडळ व असंख्य भजन मंडळ दिंडी सहभागी
ग्रामदैवत संत महादेव बाबा यांच्या पुण्यतिथी उत्सवाचा शिखर क्षण आज सायंकाळी अनुभवायला मिळणार आहे.
सायंकाळी सहा वाजल्यानंतर संत महादेव बाबांची भव्य पालखी गावातून मिरवणूक स्वरूपात काढण्यात येणार आहे. ढोल-ताशांचा गजर, भगव्या पताका, फटाक्यांची आतषबाजी आणि जयघोषांच्या वातावरणात पालखी गावभर प्रदक्षिणा करणार आहे.
या सोहळ्यात गुरुदेव भजन मंडळ तसेच असंख्य भजन मंडळ दिंडी सहभागी होत असून गाव भक्तिरसात रंगून जाणार आहे.