भक्तिमय वातावरणात रंगली गेली आहे दाभाडा नगरी..

0
41
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

येथूनच जवळ असलेल्या दाभाडा येथे संत महादेव बाबा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे त्यामध्ये विविध कीर्तन भजन यासारखे कार्यक्रम होत असल्यामुळे गेल्या तीन दिवसापासून भक्तिमय वातावरणात दाभाडा नगरी रंगली गेली असल्याचे सध्यातरी दिसून येते आहे.

 या जयंती महोत्सवानिमित्ताने या गावातील नागरिकांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

 सात दिवस चालणाऱ्या या सप्ताहामध्ये भजन भारुड कीर्तन व भल्या पहाटे सकाळी राम धुन निघत असल्यामुळे संपूर्ण वातावरण हे पहाटेच्या वेळेला अतिशय मनमोहक आणि शांतमय वातावरणामध्ये रामधून निघून असल्याने संपूर्ण वातावरण हे भक्तिमय होत असल्याचे दिसते.

 या जयंती महोत्सवामध्ये विविध कार्यक्रमांमध्ये रामधून प्रामुख्याने व पहाटेच्या वेळेला ग्रामगीतेच्या ओवीचे वाचन करण्यात येते सोबतच सामुदायिक ध्यान प्रार्थना व भजन याची साथ असल्याने संपूर्ण दिवसभर भजन आणि कीर्तन सुरू असते सोबतच यामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असल्यामुळे संपूर्ण वातावरण हे दाभाडा नगरी मधले भक्तिमय झाले असल्याचे दिसत आहे.

 या जयंती महोत्सवामध्ये आपल्या घरासमोर प्रत्येक रांगोळी सोबतच विविध साधू संतांचे फोटो ठेवून त्याची पूजा अर्चना केल्या जाते त्यामुळे येथील वातावरण हे भक्तीमय झाले आहे.

 विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्यामुळे संपूर्ण दिवसभर या मंदिरामध्ये कार्यक्रम सुरू असल्याने सगळीकडे भक्तीमय वातावरण होते त्यामुळेच ही दाभाडे नगरी भक्तीमय झाली असल्याचे सध्यातरी या परिसरामध्ये दिसून येत आहे.

 याच परिसरामधला हा सगळ्यात मोठा सप्ताह असतो असेही बोलल्या जात आहे.

veer nayak

Google Ad