ग्राहकांनी आपल्या अधिकारा बद्दल सजग राहून फसवणूक टाळावी सांगळूदकर महाविद्यालयात जागतिक ग्राहक अधिकार दिवस संपन्न

0
53
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

दर्यापूर- श्री.शिवाजी शिक्षण संस्था द्वारा संचालितजे.डी.पाटील सांगळूदकर महाविद्यालयातील वाणिज्य व व्यवस्थापन शाखा w व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC ) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ग्राहक अधिकार दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अतुल बोडखे तर प्रमुख वक्ते महेश हरिश्चंद्र भटकर तथा डॉ. मंगलावती पांण्डेंय, वाणिज्य व व्यवस्थापन शाखा प्रमुख, प्रा.मनीष होले,समन्यवयक अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC ) ,डॉ. संजय आगलावे, डॉ. राजेंद्र जदुवंशी, प्रा. सुमित घोगरे हे व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी प्रमुख वक्ते श्री महेश हरिश्चंद्र भटकर यांनी ग्राहकांना त्यांच्या हक्का प्रति जागृत राहून फसवणूक टाळली पाहिजे असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अतुल के. बोडखे यांनी याप्रसंगी बोलतांना ग्राहक हा अर्थ व्यवस्थेचा कणा आहे. योग्य भावात वस्तू आणि सेवा प्राप्त करण्याचा त्याला अधिकार आहे हे जागतिक ग्राहक अधिकार दिनानिमित्त समजून घेतले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मंगलावती पांडेय यांनी तर सूत्रसंचालन व आभार कु. धनश्री अनासने या विद्यार्थिनीने केले. यावेळी वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

veer nayak

Google Ad