धामणगाव रेल्वे,
संविधान लोकतांत्रिक देशाचा आत्मा असतो आणि भारता सारखे यशस्वी लोकतंत्र जगात कोणत्याच देशात नाही कारण भारताचे संविधान लोकशाही ला सशक्त करणारे आहे असे विचार विवेक विचार मंच विदर्भ प्रांत चे संयोजक सुनील किटकरु यांनी व्यक्त केले.
विवेक विचार मंच विदर्भ द्वारे विदर्भातील सर्व जिल्ह्यात संविधान अमृत महोत्सव वर्ष निमित्त सामाजिक संवाद मेळावे आयोजित करण्यात येत आहे. त्या अंतर्गत धामणगाव रेल्वे येथील आरोही लॉन येथे आयोजित मेळाव्यात किटकरू बोलत होते संविधान अमृत महोत्सव वर्ष निमित्त आयोजित सामाजिक संवाद मेळाव्यात समाजातील सर्वच घटकांचे प्रतिनिधित्व होते आणि संवैधानिक रित्या लोकशाहीला आणखी सशक्त करण्याच्या दिशेने सर्वांगीण विषयावर चर्चा करण्यात आली तसेच अनुसुचित जाती वर्गातील विशेष उल्लेखनीय समाजकार्य करणाऱ्या दादू उर्फ प्रविण शेंडे,उल्हास कांबळे,प्रगतीताई बावणे, विशाल रहाटे यांचा प्रामुख्याने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सत्कार मूर्तींना मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक विवेक विचार मंच चे अमरावती जिल्हा संयोजक प्रशांत मुन यांनी केले, याप्रसंगी बोलतांना संविधान बदलले जाऊ शकत नाही तर त्यात आवश्यक त्या तरतुदी करण्यात येऊ शकते असे जाहीर पणे मत व्यक्त केले.कार्यक्रमाची सुरुवात संविधानाचे प्रास्ताविक वाचून झाली तर भीम गीताने सांगता झाली.
संचालन राहुल मुन यांनी केले तर अतुल शेंडे यांनी आभार व्यक्त करतांना
विवेक विचार मंच समाजात न्याय बंधुता समता समरसता स्वातंत्र्य आणि सामाजिक सौहार्द टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने सदैव अशा प्रकारच्या कार्यक्रम उपक्रम करीता तत्पर राहील कार्य करीत राहील असे आश्वासन दिले.