धामणगाव (रेल्वे) –
श्री दत्ताजी मेघे बाल कल्याण शिक्षण संस्था द्वारा संचालित एस.ओ. एस. कब्स. येथे संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यांत आला.संविधान दिवस हा २६ नोव्हेंबर रोजी देशभरात साजरा केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार होते ज्यांनी संविधानाला आकार देण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.प्री प्रायमरी हेड मा.शबाना खान यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. संविधान म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व काय आहे याविषयी माहिती प्री प्रायमरी हेड मा. शबाना खान यांनी विद्यार्थ्याना दिली. संविधान दिना निमित्त शाळेत तिरंगा बनविण्याचा उपक्रम राबविण्यात आला.विद्यार्थ्या मध्ये सामाजिक आणि नागरीक जिम्मेदारी जागरूक करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
प्री प्रायमरी हेड मा. शबाना खान यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रणिता जोशी, रेणुका सबाने, वर्षा देशमुख, आकांक्षा महल्ले, राणी रावेकर, श्रद्धा रॉय, अश्विनी नांदने यांनी सहकार्य केले