धामणगाव रेल्वे,
मी धामणगाव रेल्वेच्या स्थानकावर जेव्हा पहिला आरपीएफ ठाणेदार म्हणून रुजू झालो त्यावेळी अनेक आव्हान माझ्यासमोर होती क्राईम,चोरी छेडखान्याच्या अशा मुख्य समस्या धामणगाव स्टेशनवर असल्याचे मला अवगत करण्यात आले होते परंतु मी रुजू झाल्यानंतर आणि आज जेव्हा दुसऱ्या ठिकाणी माझे स्थानांतरण होत असताना येथील रेल्वे स्टेशनच्या जवळपास सर्व समस्यांवर पूर्ण विराम लागले अशी जी पावती आजच्या माझ्या सत्कार सोहळ्याच्या निमित्याने उपस्थित मान्यवरांनी मला दिली याचे नेमके श्रेय माझ्यासोबतचा जिवलग असा माझा स्टाफ,कर्मचारी वर्ग, रेल्वे सल्लागार समितीचे सर्व सदस्य व आपल्यासारख्या सामाजिक राजकीय, व्यापारी, सामाजिक संघटना यांचे सहकार्य हे माझ्यासाठी प्रेरणादायी ठरले आणि त्यामुळेच मी आव्हान पेलू शकलो असे प्रतिपादन धामणगाव रेल्वे स्टेशनचे आरपीएफ चे ठाणेदार छेदीलाल कनोजाया यांनी येथे व्यक्त केले.
रेल्वे सल्लागार समितीच्या वारंवार मागणीनंतर एप्रिल २०२१ मध्ये धामणगावच्या रेल्वे स्टेशनवर आर.पी.एफ चे ठाणे मंजूर करण्यात आले या ठाण्याचे प्रथम ठाणेदार म्हणून कनोजिया यांना नियुक्त करण्यात आले ३ वर्षाच्या कालावधीनंतर कनोजिया यांचे वर्धा येथे स्थानांतरण झाले या अनुषंगाने त्यांचा सत्काराचा कार्यक्रम रेल्वे स्टेशनच्या प्रतीक्षालय येथे आरपीएफ चा स्टाफ, रेल्वे सल्लागार समिती, ज्येष्ठ नागरिक संघटना व सामाजिक संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आला यावेळी कनोजिया यांचे उत्साहाने स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी मंचावर सत्कारमूर्ती छेदीलाल कनोजिया सह स्टेशनअधिक्षक मुदलियार,रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य कमल छांगाणी आणि अर्चना राऊत उपस्थित होते.
——————————-
कनोजिया या व्यक्तिमत्त्वासोबतच त्यांच्या कार्याचा गौरव आणि सत्कार- छांगाणी
ज्या प्रथम ठाणेदार म्हणून कनोजीया साहेब धामणगावच्या रेल्वे स्टेशनवर रुजू झाले त्यावेळी त्यांचा सत्कार आमदार प्रताप अडसड यांच्या हस्ते व रेल्वे सल्लागार समितीच्या वतीने घेण्यात आला होता रुजू झाल्यानंतर कनोजीया यांनी क्राईम, रात्रीच्या वेळेस महिला प्रवासांच्या छेडखान्या, चोऱ्या,टवाळक्या अशा मुख्य समस्यांना पूर्ण पणे आळा घातला त्यासोबतच स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरा असावा आरपीएफ स्टाफ करिता कॉटेज असावे आणि स्टाफ करिता पूर्ण साहित्य उपलब्ध असावे या मागणी सुद्धा रेल्वे प्रशासनाकडे केल्यात त्यामुळे कनोजिया यांनी रुजू झाल्यापासून आजतागत सार्वभौम कार्य धामणगाव रेल्वे स्टेशन करिता केले असल्यामुळे त्यांच्या उत्तम स्वभावासोबतच त्यांच्या कार्याचा गौरव व सत्कार करण्यात येत असल्याचे यावेळी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य कमल छांगाणी म्हणाले.
ते म्हणाले की कनोजीया आणि मीना यांच्या नेतृत्वात धामणगाव रेल्वे स्टेशनला उत्कृष्ट असा स्टाफ मिळालेला आहे सर्वांचेच कार्य उल्लेखनीय आहे.
——————————————–
सत्कार समारंभाचे आपले अध्यक्षीय भाषणात मुदलियार यांनी कनोजिया यांचा माझे खास मित्र व सहकार्य करणारा अधिकारी म्हणून विशेष उल्लेख केले.
आरपीएफ स्टॉप च्या वतीने एच.एल.मीना, गजानन जाधव, उमेश धुराटे,अनिस खान सह रेल्वे विभागाचे खेडेकर, विक्रम शेखावत यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले आम्हाला कनोजीया साहेबांनी परिवाराप्रमाणे वागवले असे भावोद्गार यावेळी स्टाफने केले.
ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने लक्ष्मीनारायण चांडक संपादक अशोक मुंदडा व नितीन कनोजिया,मुकुंद रंगारी यांनी सुद्धा विचार व्यक्त केलेत.
कार्यक्रमाला आरपीएफचे एच.एल मीना,रमेश वाघमारे ,गजानन जाधव ,एस एम गजभिये,अरुण घोडके ,संजय खंडारे ,एम मुरुमकार ,संजय बोरुड़े,अनीस खान, अमर वानखड़े,निलेश पिंजरकर,उमेश धुराटे,आकाश मेश्राम,राहुल यादव ,अंकुश मेश्राम,पंकज खसाले,मिथुन परिहार,नितीन कनोजिया,अश्विन जयस्वाल,ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अशोक मुंदड़ा, प्रभात काळे दिनकर लबडी, जेठमल तापड़िया, दादाराव चौधरी सुरेश भंडारी, प्रवीण राठी, राजू आठवले,लाला शर्मा,लक्ष्मी नारायण चांडक,प्रेमचंद मूंदड़ा,सुरेश लोया, हरि भुतडा,दिलिप भंडारी,नितीन कनोजिया,मुकुंद रंगारी प्रामुख्याने उपस्थित होते