स्वयंरोजगार निर्मितीचे तिहेरी शतक पूर्ण एक हजार महिलांना शिलाई मशीन वाटप करण्याचा केला निर्धार नितीन कदम यांच्या सामाजिक कार्याची साखळी मालिका

0
24
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

प्रतिनीधी/अमरावती

बडनेरा शहर व ग्रामीण परिसरातील आर्थिक दृष्ट्या गरीब निराधार कुटुंबातील महिलांचा सामाजिक व आर्थिक विकास व्हावा तसेच त्यांना घरबसल्या रोजगाराची एखादी संधी उपलब्ध व्हावी जेणेकरून ते स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाच्या आर्थिक गरज पूर्ण करू शकतील या उद्देशाने मोफत शिलाई मशीन चे वाटप करण्यात येते.
दरम्यान बडणेरा ग्रामीण भागातील पिंपळखुटा येथिल निराधार महिलेला शिलाई मशीन वितरित करतं आपल्या ‘संकल्प स्वयंरोजगार योजना’ अंतर्गत तिहेरी शतक पूर्ण केले आहे.
महिलांना कुटुंबाच्या दैनंदिन गरजांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये महिलांना शिलाई मशीन च्या खरेदीसाठी कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील आर्थिक उत्पन्नात थोड्याफार प्रमाणात वाढ करणे,महिलांचे भविष्य उज्वल बनविणे,बडनेरा शहर व ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करणे,बेरोजगार महिलांना रोजगाराच्या नवीन संधी,उपलब्ध करणे,बडनेरा भागाचा आर्थिक विकास करणे,महिलांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी प्रोत्साहित करणे या नितीन कदम यांच्या संकल्प स्वयंरोजगार योजनेचा हेतू आहे. सदर योजनेअंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील आर्थिक दुर्बल घटक व निराधार महीला संकल्प सहाय्यता कक्षात (रुक्मिणी नगर,अमरावती) येथे अर्ज करु शकतात अथवा ७७२२००४३४४ या मदत कक्षाच्या भ्रमणध्वनीव्दारे संपर्क साधण्याचे आवाहन नितीन कदम यांच्याकडून कऱण्यात आले आहे.

यावेळी नितीन कदम यांनी आपल्या संस्थेमार्फत १००० शीलाई मशिन वाटप करण्याचा निर्धार केला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

veer nayak

Google Ad