रास्ते, नाली, सारख्या मूलभूत गरजा करिता महिला धडकल्या नगरपालिका कार्यालयावर, चिखलयुक्त रस्त्यावर चालण्याकरिता नागरिक झाले मजबूर 

0
46
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चांदुर रेल्वे/ शहरातील महारुद्र नगर येथील रहिवाशी महिला या कॉलनीतील रोड नाल्या सारख्या मूलभूत गरजे करिता स्थानीय नगर परिषद कार्यालय वर बुधवारी निवेदन दिले, या कॉलनीत राहणारे नागरिक महिला लहान मुले यांना आजही चिखलमय रस्त्यावरून येने जाणे करावे लागत आहे, या रस्त्यावर चिखल असल्याकारणाने कित्येक वेळा गाडीत फिरून लहान-मोठे अपघात झाले आहे, या संदर्भात स्थानीय नगरपालिकेला पुष्कळ वेळ निवेदन दिले आहे, बुधवारी पुन्हा महारुद्र कॉलनीतील महिलांनी या समस्या करिता निवेदन दिले, यावेळी महिला स्थानिक अधिकाऱ्यावर आक्रमक झाल्या होत्या, पण पप्पू भालेराव यांनी महिलांना शांत करत अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली व व या समस्यावर मार्ग काढण्याकरिता विनंती केली,

 शहरात मागील बारा ते पंधरा वर्षात महारुद्र कॉलनी बनवण्यात आली आज या कॉलनी कितीतरी घर बांधले आहे, येथील नागरीक नगर पालिकेला नियमित कर भरतात, तरीसुद्धा नगरपालिकेकडून या कॉलनी मधे रोड,नाल्या,नळ कनेक्शन सारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या नाही, यावेळी महिलांनी सांगितले की या कॉलनीत लाईट ची सुविधा तर आहे पण ते सुद्धा रात्री बे रात्री बंद पडतात, या कॉलनी रोड न बांधल्यामुळे पावसाच्या पाण्यामुळे येथील रोड चिखलमय झाले आहे, रोडवर चिखल झाल्यामुळे या रस्त्यावर गाड्या फिसलून किती तरी लहान मोठे अपघात झाले आहे, कॉलनीत नाल्या नसल्यामुळे पावसाचे पाणी घराच्या आजूबाजूला साचते त्यामुळे येथे डासांचा प्रकोप वाढला आहे, यासंदर्भात येथील नागरिकांनी स्थानीय नगरपालिकेत कित्येक वेळा निवेदन दिले आहे पण आतापर्यंत या निवेदनाची दखल घेण्यात आली नाही आज बुधवारी सुद्धा या कॉलनीतील महिलांनी रोड नाल्या नळ कनेक्शन सारख्या मूलभूत सुविधा मिळाव्या म्हणून नगरपालिकेत निवेदन दिले आहे यावेळी समाजसेवक पप्पू भालेराव यांनी अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करून या विषयावर तोडगा काढण्याची विनंती केली आहे, 

 

निवेदन देतेवेळी पप्पू भालेराव, संध्या ठाकूर, शितल ठाकूर, मंगला गोल्हर, मनीषा राठोड, वैशाली चौधरी, मनीषा सव्वा लाखे,वनिता झेले, सुजाता महाजन, शालिनी मरकाम, मंदा वाघ ,वंदना भोंडे ,राणी यावले, रेखा मतलांने,वैशाली देशमुख, आदी महिला यावेळी हजर होती,

veer nayak

Google Ad