चायना नायलॉन मांज्या विकणाऱ्यांवर प्रशासन कार्यवाही करणार का? नायलॉन मांज्यामुळे पतंग उडवताना रस्त्यावरील जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांना गमवावा लागु शकतो जीव

0
0
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आर्वी, प्रतिनिधी /पंकज गोडबोले

आर्वी : अनेक वर्षापासून परंपरागत चालत असलेला संक्रांत सन या सणांमध्ये लहान मुल व मोठी मंडळी सुद्धा पतंग उडवण्या करीता माेठ्या उत्साहाने सहभागी हाेत असते अगोदर पतंग साध्या धाग्यांनी उडवल्या जात होती परंतु गेल्या काही वर्षांपूर्वी चायना वरून येत असलेल्या नायलॉन मांजानी पतंग उडवल्या जात आहे. घराच्या स्लॅप वर किंवा घराजवळील पटांगणावर पतंग उडवत असताना एकमेकांसोबत पतंग कटाकटीच्या शर्ती सुद्धा लागत असतात व त्यामध्ये एखाद्या व्यक्तीची पतंग कटली तर लहान मुलं ते पतंग पकडण्यास धावा धाव करते त्या धावपळीत त्या मुलांना इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच कटलेली पतंग पकडण्याकरिता लहान मुलांचे एकमेकांसोबत भांडण सुद्धा होतात त्या मांजा ओडतानी मध्ये रस्त्यावर येत-जात असणाऱ्या नागरिकांना नायलॉन मांजाचा नाहक त्रास सहन करावा लागतो कित्येकदा त्या नायलॉन मांजाने अनेकांना अपंगत्व व जीव गमावा लागला तरीसुद्धा प्रशासनाला जाग येत नाही व त्या नायलॉन मांजावर कारवाई होत नाही. नायलॉन मांजा विकणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करून अशा प्राणघाती नायलॉन मांजावर बंदी घालावी अशा नायलॉन मांजामुळे इजा झालेले संतप्त नागरिक हा नायलॉन मांजा बंद करा अशी मागणी करत आहे.

 प्रतिक्रिया

आपण पाहतो पतंग उडवत असताना काेणी बिल्डिंग वरून पडला तर कोणाचा नायलॉन मांजाने हात कटला अशा बातम्या कानावर येतात नायलॉन मांजा मुळे रोडवरील जाने-येने करणाऱ्यांना दुर्घटनेचा सामना करावा लागतो अशा प्राणघाती नायलॉन मांजा विकणाऱ्या वर प्रशासनाने कडक कारवाई करायला पाहिजे ..! 

 सुधीर जाचक सामाजिक कार्यकर्ता

——————————————

प्रतिक्रिया

  नायलॉन मांजाने पतंग उडवत असतांना कोणाचा हात तर कोणाची मान कापल्याच्या अनेक घटना समोर येतात व त्यामध्ये अनेक लहान मुलांना आपला जीव सुद्धा गमावा लागताे म्हणून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नायलॉन मांजावर कडक कारवाई करण्याची नितांत गरज आहे..!

 मनोज आगरकर सिव्हिल इंजिनियर

veer nayak

Google Ad