मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात काशीबाई अग्रवाल विद्यालयाचा तालुक्यातून तृतीय क्रमांक ( उज्वल यशाची परंपरा कायम ) येवदा येथील ‘ येवदा शिक्षण संस्था येवदा ‘द्वारा संचालित काशीबाई अग्रवाल विद्यालय व कै. भाऊसाहेब देशमुख उच्च माध्यमिक विद्यालय हे सातत्याने नावाजलेले व नावलौकिक प्राप्त विद्यालय असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागामार्फत ‘ मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा ‘ अभियानात येवदा केंद्रातून प्रथम क्रमांक तर दर्यापूर तालुक्यातून तृतीय क्रमांक प्राप्त करत उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे केंद्र स्तरावरील व तालुका स्तरावरील परीक्षण करणाऱ्या शिक्षण विभागाच्या पथकाने मूल्यांकन करून राबविलेल्या 30 उपक्रमामध्ये शालेय रंगरंगोटी,वृक्षारोपण,वर्ग सजावट, परसबाग, कौशल्य विकास, आर्थिक व्यवस्थापन, आरोग्य तपासणी, किशोरवयीन मुलींसाठी विशेष मार्गदर्शन, क्रीडा स्पर्धा आयोजन, तंबाखू मुक्त शाळा, महावाचन चळवळ, प्लास्टिक मुक्त परिसर, डिजिटल बचत बँक, बाल संसद, वक्तृत्व स्पर्धा, गीत गायन व निबंध स्पर्धा, स्वच्छता मॉनिटर, स्वच्छ हात धुणे, भौतिक सुविधा, राष्ट्रीय एकात्मता, मेरी माटी मेरा देश, सांस्कृतिक कार्यक्रम, लोकसहभागातून देणगीची उपलब्धता, वर्षभरातील विविध उपक्रम व शैक्षणिक गुणवत्ता, शाळे द्वारा आयोजित सामाजिक उपक्रम व बांधिलकी, इ. मुद्द्यांच्या आधारे येवदा केंद्रातून प्रथम क्रमांक तर दर्यापूर तालुक्यातून तृतीय क्रमांक मिळवत उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. या सर्व उपक्रमातील नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून उभारलेली डिजिटल बँक हा आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना सार्वजनिक बँकेप्रमाणे सर्व ऑनलाईन सुविधा उपलब्ध उपलब्ध असून शाळेतील सर्व विद्यार्थी डिजिटल बँकेचा लाभ घेत आहेत. या सर्व उपक्रम व यशासाठी “येवदा शिक्षण संस्था येवदा चे अध्यक्ष अण्णासाहेब ठाकूर, सचिव हर्षराज देशमुख, कोषाध्यक्ष तथा पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप भाऊ देशमुख, ज्येष्ठ संचालक जी जी देशमुख, मनोज भाऊ देशमुख यांच्यासह सर्व संचालक मंडळाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाल्याचे शाळेचे मुख्याध्यापक राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त निळकंठ बोरोळे यांनी आपल्या प्रतिक्रिया दरम्यान सांगितले आहे. सदर अभियान राबवत असताना शाळेतील सर्व प्राध्यापक, शिक्षक शिक्षिका, सर्व कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी यांनी सक्रिय सहभाग घेत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात आपले योगदान दिले आहे. सोबतच पालक, दानदाते, माजी विद्यार्थी, पालक प्रतिनिधी, गावातील प्रतिष्ठित मंडळी, यांचे देखील सातत्याने सहकार्य लाभले. सदर उपक्रमाने शाळेमध्ये चैतन्यदायी वातावरण निर्माण होऊन शिक्षणासोबतच विविध उपक्रमांनी शिक्षण आनंददायी होण्यास मदत झाली व शाळेने तालुक्यातून तृतीय क्रमांक प्राप्त केला. शाळेने मिळवलेल्या घवघवीत यशासाठी संस्थाध्यक्ष अण्णासाहेब ठाकूर, सचिव हर्षराज देशमुख, कोषाध्यक्ष प्रदीप भाऊ देशमुख, संचालक जी जी देशमुख मनोज भाऊ देशमुख यांच्यासह सर्व संचालक मंडळी यांनी मुख्याध्यापक निळकंठ बोरोळे व सर्व प्राध्यापक, शिक्षक शिक्षिका, कार्यालयीन कर्मचारी, सर्व विद्यार्थी यांचे कौतुक अभिनंदन केले आहे.
Home आपला विदर्भ मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात काशीबाई अग्रवाल विद्यालयाचा तालुक्यातून तृतीय क्रमांक