धामणगाव रेल्वे
सतत एकाच ठिकाणी बसून राहणे, व्यायामाचा अभाव कोल्ड्रिंक, फास्टफूड घेणे अपुरी झोप व्यसनाधीनता जीवनशैलीत बदल केला तर हृदयरोग टाळण्यास मदत होऊ शकते असा मंत्र हृदयरोग तज्ञ डॉ. राम घोडेस्वार, डॉ. कमल भुतडा ,डॉ. योगेश कोळमकर यांनी धामणगावात दिला
पंचवीस -तीशी वयोगटातील नवयुकांना वाढलेला हृदयविकाराचा धोका , होणाऱ्या मृत्यु पासुन नव पिढीत जनजागृती व्हावी याकरिता स्व. आलोक पोळ व सौरभ दशसहस्त्र यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयएमए , धामणगाव मेडिकल असोशिएशन, हेल्पिंग हँड यांच्या वतीने माहेश्वरी भवन येथे रविवारी २५ ते ५० वयोगटातील नागरिकांसाठी हृदयरोग निदान व चर्चा सत्र आयोजित केले होते यात १२३ जणांनी आपल्या हृदयाची तपासणी करून घेतली
पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करणाऱ्या तरुणाईची जीवनशैली बदलली आहे.अयोग्य आहार पद्धती, जागरण, धूम्रपान, ताणतणाव
मद्यपानासह दुग्धजन्य पदार्थ, केकसारखे पदार्थ खाण्याकडे कल वाढला आहे. हेच मुख्य कारण हृदयविकाराचे असल्याचे डॉ. कमल भुतडा म्हणाले यातून बाहेर पडण्यासाठी सल्ला त्यांनी दिला.अॅसिडिटी किंवा गॅसेसच्या त्रासामुळे देखील अस्वस्थ वाटू शकतं. हाच त्रास असेल असा गैरसमज युवक करीत दुखण्याकडे दुर्लक्ष करतात. अशा वेळी योग्य उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागतो ईसीजी करुन घ्यावी असे डॉ राम घोडेस्वार यांनी सांगितले सध्याच्या काळात तारुण्यात येणाऱ्या हार्ट अटॅकमागे त्यांच्या कौटुंबिक इतिहासात मधुमेह, उच्च रक्तदाब असे कारण असू शकतात. वेळेवर तपासणी करून घेणे महत्त्वाचे असल्याचे डॉ योगेश कोळमकर म्हणाले . तानतनाव व हृदयविकाराचा धोका यासंदर्भात सविस्तर माहिती मानसिकरोग तज्ञ डॉ प्रीतम चांडक यांनी या चर्चासत्रात दिली.प्रत्येक नवयुवक आपल्या कुटुंबाचा मुख्य भाग असतो हार्ट अटॅक मुळे कर्ता व्यक्ती गेला तर संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडते त्यामुळे अशा आजाराकडे दुर्लक्ष करू नये असे आवाहन आपल्या प्रस्ताविकातून आयएमए चे अध्यक्ष डॉ. अशोक भय्या यांनी केलें हृदय रोगाची लक्षणे ,त्यावर त्वरित उपाय व तंत्रज्ञानाच्या उपचार पद्धती याविषयी डॉ. आकाश येंडे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात तज्ञांना विचारले याची समर्पक उत्तरे हृदयरोग रोग तज्ञांनी उपस्थितांना दिली यावेळी मंचावर डॉ. अशोक सकलेच्या डॉ. भरत पालिवाल होते संचालन डॉ. असित पसारी यानी केलें
डॉ प्रकाश राठी , डॉ,अमित गुल्हाने, डॉ पवन शर्मा , डॉ. कृष्णा बुटले, डॉ. सत्यशील टोकसे, डॉ. किशोर माकोडे, डॉ. छागाणी, डॉ. कहाळे,हेल्पिंग हॅन्ड ग्रुपचे निखिल भन्साली उपस्थित होते