चांदुर रेल्वे/ तालुका प्रतिनिधी
चांदुर रेल्वे येथील विश्रामगृह आहे ते शिवसेना शिंदे यांची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये शिवसेना लोकसभा विस्तारक राज दिक्षित यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटो पुजन व हार अर्पण करुन सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपले महायुतीचे उमेदवार निवडून आणायचे आहे, सरकारी योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही शिवसैनिकाची आहेत,व शिवसेना पक्षाची सदस्य नोंदणी व गाव तिथे शिवसैनिक व गाव तिथे शाखा तयार करण्याच्या आदेश सर्व पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत, ज्या पदाधिकाऱ्यांना जे काम सुचवलेले आहे त्यांनी ते आपल्या जबाबदाऱ्यांनी पार पाडावे अन्यता त्यांना पदावरून निष्कर्षित केल्या जाईल कोणाचीही हयगय केल्या जाणार नाही व कोणाचीही शिफारस चालणार नाही असे आदेश लोकसभा विस्तारक राज दिक्षित यांनी दिले आहे, यावेळी उपस्थित मध्ये निशांत हरणे जिल्हाप्रमुख शिवसेना, अमित मेश्राम किशोर राठोड ,पंकज राठोड तालुका प्रमुख चांदुर रेल्वे, पवन ठाकरे तालुका प्रमुख नांदगाव खंडेश्वर, गोलु यादव शिवसेना शहर प्रमुख, मनोज जैन उपतालुकाप्रमुख नांदगाव, माया देशमुख शिवसेना आरोग्य जिल्हा प्रमुख, जयश्री कातकिडे जिल्हाप्रमुख महिला आघाडी, सुनिता जगताप महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख, अक्षय सुरवसे आकाश चौधरी लोकेश शेळके, गोपी यादव अजय माहुलकर ओम शेलार निखिल यादव श्रीकांत गोसावी चेतन ठाकूर नंदुरबार विजय माहुरकर समीर राऊत यांच्या सह अनेक शिवसेना युवासेना महिला आघाडी पदाधिकार्यांची उपस्थिती होती.