चांदूर रेल्वे तालुका केमिस्ट आणि ड्रगिस्ट संघटना यांच्यातर्फे ही आज दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी अग्रसेन धर्मशाळा सिनेमा चौक चांदुर रेल्वे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले

0
4
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तसेच महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड रजिस्ट असोसिएशन यांचे अध्यक्ष केमिस्ट्रुदय सम्राट माननीय श्री जगन्नाथ उर्फ आप्पासाहेबजी शिंदे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात 75000 युनिट रक्त संकलन करण्याचा संकल्प देशातील तमाम केमिस्ट बांधवांनी केलेला होता. त्याचाच एक भाग म्हणून चांदूर रेल्वे तालुका केमिस्ट आणि ड्रगिस्ट संघटना यांच्यातर्फे ही आज दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी अग्रसेन धर्मशाळा सिनेमा चौक चांदुर रेल्वे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला 75 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले बहुमूल्य रक्तदान करून मदत केली तसेच सौं चौधरी व श्री सलील चौधरी या जोडप्यांनी सुद्धा आज रक्तदान करून समाजापुढे नवीन आदर्श प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमाकरिता चांदुर रेल्वे तालुका केमिस्ट आणि ट्रस्ट संघटनेचे अध्यक्ष श्री महेश भूत तसेच रवींद्र कडू,अंकुर खाकोले, दिलीप मोहनानी, प्रदीप जैन, मदन काका कोठारी,श्री राजूभाऊ अजमिरे,श्री शाम जाजू,इमरान लाखानी,अंकुश जोशी,योगेश बजाज,धीरज मोटवानी,निलेश रोहातिया, बालाजी ब्लड बँक अमरावती यांची संपूर्ण टीम तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री हर्षल वाघ,मनोज भारुका,दिनेश अग्रवाल, राहुल जैन,सुमित चोरडिया,कीर्ती जैन तसेच एम एस सी बी तील कर्मचारी यांचे विशेष योगदान प्राप्त झाले.

Laksh

Google Ad