चांदुर रेल्वे शहरावर सकाळपासून जलाभिषेक @ संपूर्ण तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी.

0
37
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चांदूर रेल्वे :- चांदूर रेल्वे शहरासह संपूर्ण तालुक्यात आज सकाळपासून वेगवान पावसाने रुद्र रूप धारण करून जनू जलप्रयलच घडूवुन् आनल्याचे चित्र पाहावयास मिळाले. शहरातील अनेक लोकवस्त्यामध्ये घरा घरामध्ये पाणी घुसल्याने जनजीवन विस्कळीत झालेचेही वृत्त समजले.

पत्रिकार कॉलोनी मधील रहिवासी मुकिंदा सावंत आणि टावरी यांचे संपूर्ण घरामध्ये पाणी घुसून नुकसान झाले आहे. सततच्या पावसाने नागरिकांचे झालेल्या नुकसानाबाबत तहसील कार्यलयाशी संपर्क केला असता तात्काळ तलाठी व मंडळ अधिकारी चव्हाण आणि निलेश स्थूल ह्यानि घरांची पाहणी करून पंचनामा केला. नगर परिषदेचे मुख्याधिकारी विकास खंडारे यांनी अनेक वसत्यात साचलेल्या पाण्याला मोकळी वाट करून देण्यासाठी तात्काळ जेसीबी उपलब्ध करून देण्यात आला.

चांदुर रेल्वे वरून जाणारा नांदगाव खंडेश्वर मार्ग वरील रेल्वे पुलाजवळील नाल्याला मोठ्या प्रमाणात जलप्रवाह वाहत असल्याने वाहतूकिचा मार्ग बंद झाला आहे.तसेच मांजरखेड जाणारा मार्ग देखील नदीला जलप्रवाह वाहत असल्याने बंद झाला आहे.

सकाळपासून सततच्या या पावसामुळे महारुद्र नगर पात्रिकार, कॉलोनी ,खडकपुरा ,शेंद्रीपुरा डांगरीपुरा अशा अनेक लोकवस्तीत असणाऱ्या नागरिकांच्या समस्या वाढत आहे. तर प्रशासनाच्या वतीने योग्य ती पावले उचलली जात आहे,

” रात्री उशिरापर्यंत महसूल विभाग तसेच पोलीस विभागातील कर्मचारी परिस्थितीवर पाहणी करताना दिसून आले,तर शहरातील रेल्वे पुलाच्या खालून मोठ्या प्रमाणात जलप्रवाह वाहत होता त्या ठिकाणी वाहन धारकांनी जाऊ नये म्हणून सुद्धा करण्यात आले होते “.

veer nayak

Google Ad