चांदूर शहरातील श्री जगदंबा मंदिरात नवरात्र उत्सव होतोय उत्साहात साजरा… सायंकालीन आरतीला शेकडो भाविकांची हजेरी..

0
9
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

प्रतिनिधी :- 

चांदूर रेल्वे :-

               चांदूर शहराचे आराध्य दैवत मानल्या जाणाऱ्या जुन्या अमरावती रोड परिसरामध्ये स्थित असलेल्या श्री जगदंबा देवस्थान येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.दररोज सकाळी व संध्याकाळी होणाऱ्या महाआरतीला शहरातील शेकडो भाविक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित असतात. नवरात्रीच्या ह्या भक्तिमय वातावरणात दररोज भजन , अष्टमीला होम हवन तसेच 13 ओकॉटोबर रोजी महाप्रसादाचे देखील आयोजन केले आहे. सर्व भाविक भक्तांनी ह्या महाप्रसादचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील मंदिराच्या विश्वस्त मंडळाकडून करण्यात आले आहे. शहरातील अतिशय पुरातन असलेले ह्या मंदिराचा काही भाग मागील काही वर्षात जीर्ण झाला असून नवनियुक्त अध्यक्ष

 

सचिन वर्मा व विश्वस्त मंडळ ह्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पुढे सरसावले असून भाविकांनी मंदिराच्या बांधकामासाठी सढळ हाताने सहकार्य करावे असे आवाहन देखील केले आहे शिवाय लोकप्रतिनधिनींनी सुद्धा अतिशय पुरातन असलेल्या ह्या मंदिराच्या विकासासाठी सरकारी निधी ची तरतूद करून द्यावी अशी मनीषा देखील सचिन वर्मा यांनी प्रतिक्रिया देताना व्यक्त केली आहे.

veer nayak

Google Ad