अमरावती जिल्हात चांदुर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान येथे दिनांक २१/७/२०२४ रविवारला दुपारी ४.०० वाजता संस्थानच्या वतीने आषाढी गुरुपौर्णिमा निमित्त “चंदन – ऊटीचा कार्यक्रम” आणि रात्री ८.०० वाजता अवधूत नाम प्रबोधनकार शामराव राठोड महाराज,सिंदखेड ता.नेर(परसोपंत) जि.यवतमाळ यांचा महाराजांची गाथा ओवी क्र.१- उल्हासले मन, सोडली पंढरी या ओवीवर “प्रवचन कार्यक्रम” आयोजित करण्यात आलेला आहे.
चंदनउटी नंतर बाहेर गावावरून येणारे भाविकांकरिता “महाप्रसाद कार्यक्रम” संस्थानचे अन्नदान समितीच्या नियोजनात आयोजन करण्यात आले आहे.
दि. २२/७/२०२४- सोमवार रोजी सकाळी संस्थानमध्ये “गुरु पुजन कार्यक्रम” आयोजित करण्यात असून या कार्यक्रमात सर्व भाविक भक्तांनी सहभागी व्हावे.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी संस्थानमध्ये “श्रावण मास” निमित्त ३६ दिवस अखंड जागृती भजन (दिवसरात्र) मांडीचा शुभारंभ दि. ४/८/२०२४ रविवार पासून होत आहे. ज्या अवधूत भजन मंडळांना या मांडीमध्ये सहभाग घ्यावयाचा आहे, त्यांनी संस्थानचे सचिव अशोक हरिदासजी सोनवाल (मोबा.क्र.९९२३७०२१०३) वर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे.
तरी सर्व भाविक- भक्तांनी तन-मन-धनाने सहकार्य करून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, अशी विनंती संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे, उपाध्यक्ष कृपासागर राऊत, सचिव अशोक सोनवाल सर्व विश्वस्त विनायक पाटील,वामण रामटेके,गोविंद राठोड,दिगांबर राठोड,अनिल बेलसरे,फुलसिंग राठोड,चरणदास कांडलकर,वैभव मानकर, स्वप्निल चौधरी विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.