धामणगाव रेल्वे, ता.८:- जिल्हा परिषदेच्या सीईओ संजिता मोहपात्रा यांनी शुक्रवारला (ता.६) तळेगाव दशासर,शेंदूरजना खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेची पाहणी करत विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला.दरम्यान धामणगाव पंचायत समिती कार्यालयाला आकस्मिक भेट देऊन आढावा घेतला.
अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजिता मोहपात्रा यांनी येथील पंचायत समितीच्या कार्यालयाला आकस्मिक भेट दिली व आढावा घेतला.त्यानंतर तालुक्यातील तळेगाव दशासर येथील जिल्हा परिषद शाळेला अचानक भेट दिली.येथील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांना प्रश्नाची उत्तरे विचारली विद्यार्थ्यानी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजिता मोहपात्रा यांना प्रतिसाद देत उत्तरे दिली.तसेच प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत शालेय पोषण आहार योजनेचा आढावा घेतला.यावेळी गटविकास अधिकारी माया वानखडे,गटशिक्षणाधिकारी संदीप बोडखे,सहाय्यक गटविकास अधिकारी मीना म्हसतकर,गटसमन्वयक धीरज जवळकार,शालेय पोषण आहार अधीक्षक व मुख्याध्यापक अरुण चव्हाण,शिक्षण विभागातील संजय गुल्हाने,केंद्रप्रमुख नरेश पाटील,बंडू राठोड,विष्णू राठोड,माला फाळे,देवयानी धुमाळ,स्नेहा सहारे,सचिन चव्हाण,प्रणिता शर्मा, भाग्यश्री घोंगडे व आदी उपस्थित होते.तसेच त्यानंतर तालुक्यातील शेंदूरजना खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला.विद्यार्थ्यानी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली.वर्ग पहिली व तिसरीच्या विद्यार्थ्याचे वाचन घेतले.शाळेतील भौतिक सुविधा, शालेय पोषण आहार,पटसंख्या, शिक्षक संख्या याची माहिती घेतली.शाळेतील डिजिटल हॉल,शाळेचे कार्यालय पाहून समाधान व्यक्त केले. कांचन मकरंद खेडकर या शिक्षिकेच्या कार्याची दखल घेऊन संजिता मोहपात्रा यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून अभिनंदन केले.
यावेळी मुख्याध्यापक गणेश गावंडे,पंकज देशमुख,कांचन खेडकर,श्री गोल्हर,शक्ती राठोड व आदी उपस्थित होते.
———-
सीईओनी घेतला खिचडीचा आस्वाद
तळेगाव दशासर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सीईओ मोहपात्रा यांनी मुलांना शालेय पोषण आहार अंतर्गत देण्यात येणाऱ्या आहाराची पाहणी केली. धान्याची स्वच्छता, सुरक्षितता, दर्जा व गुणवत्तेची पाहणी करून खिचडी स्वत: खाऊन पाहिली.
———