सिमेंट काँक्रीट रस्ते, नाल्या, पूल म्हणजे विकासाचे पाऊल का ?

0
21
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे मतदार संघातील नागरिकांचा प्रश्न चांदुर रेल्वे बंडू आठवले वर्धा लोकसभा मतदार संघापासून 80 किलोमीटरवर धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघ वर्धा लोकसभा क्षेत्रामध्ये येतो. त्या तुलनेत अमरावती लोकसभा क्षेत्रापासून तीस किलोमीटरवर धामणगाव रेल्वे मतदार संघ लागला आहे. त्यामुळेच कीं काय आमचा मतदार संघ विकासा पासून कोसो दूर आहे. खासदार आमदार यांनी सिमेंट काँक्रीट रस्ते, डांबरीकरण, नाल्या, पूल, म्हणजे मतदार संघामध्ये केलेला विकास का ? अशी संतप्त प्रतिक्रिया धामणगाव रेल्वे मतदार संघातील नागरिक करीत आहे. चांदूर रेल्वे पासून 80 किलोमीटरवर वर्धा लोकसभा मतदारसंघ आहे. त्यामुळेच वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार त्यांचे चांदुर रेल्वे शहराकडे व तालुक्याकडे फारसे लक्ष नसते. त्यामुळेच कोरोना काळात बंद झालेल्या रेल्वेच्या थांब्याला सुरू करण्यासाठी दोन वर्षाचा संघर्ष शहरातील नागरिकांना करावा लागला. त्यामुळेच आपल्या दहा वर्षाच्या खासदारकीच्या कालावधीमध्ये धामणगाव रेल्वे मतदार संघात एकही विकासाचे मोठे पाऊल आले नाही. शेतकऱ्यांची प्रश्न, वाढत असलेली महागाई, बेरोजगारांचे प्रश्न, अजूनही अनुत्तीर्ण आहेत. या भागातील एमआयडीसी ओस पडली असून बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल असा एकही उद्योग धंदे या एमआयडीसीमध्ये आणला गेलेला नाही. मग काय तर सिमेंट काँक्रीट रस्ते डांबरीकरण पूर्ण झाल्या यासाठी निधी दिला म्हणजेच विकासाचे फार मोठे पाऊल का? असे प्रश्न धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील चांदुर रेल्वे येथील नागरिक करीत आहे. अमरावती लोकसभा मतदार संघ पासून अवघ्या 30 किलोमीटर आहे आणि आमचा जिल्हा सुद्धा अमरावती पडतो त्यामुळे दोन्ही बाजूने मधात असलेला हा मतदार संघ आज विकासापासून कोसो दूर गेला आहे. आजच्या घडीला चांदुर रेल्वे तालुक्यात व ग्रामीण भागात एखादा तरी बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल असा प्रकल्प भविष्यात निर्माण होईल का? कवडीमोल भावाने डबघाईस आलेला शेतकरी प्रगतीची नवी दिशा निर्माण करेल काय? या मतदारसंघांमध्ये शिक्षणासाठी चांगल्या सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी येणारा खासदार लक्ष देईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे या मतदारसंघातील सामान्य जनता वाट पाहत आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांना न्याय मिळेल का?

veer nayak

Google Ad