वाढोणा येथे वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सव थाटात साजरा

0
31
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे/‌

वाढोणा (गा.)/12/12/2024 दरवर्षीप्रमाणे वाढोणा येथे वर्ष 44 वे वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सव वाढोणा येथील गावांमध्ये थाटात पार पडला. हा कार्यक्रम चार दिवसीय असून घटस्थापना तळेगाव दशासर येथील ठाणेदार रामेश्वर धौंडगे यांच्या हस्ते झाली. व मार्गदर्शन केले त्यानंतर सर्व धर्म सामुदायिक प्रार्थनेच्या महत्वार विशाल ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता सामुदायिक ध्यान पाठ व ध्यानाच्या महत्त्वावर रुपरावजी बुटके यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर रांगोळी स्पर्धा, भाषण स्पर्धा घेण्यात आल्या. सायंकाळी सात वाजता सर्वधर्म सामुदायिक प्रार्थनेच्या महत्त्वावर अनिलजी बगाडे यांनी मार्गदर्शन केले. तिसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता सामुदायिक ध्यानाच्या महत्त्वावर डॉ. प्रशांत इंगोले यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर गावामधून सकाळी आठ वाजता वैराग्यमूर्ती गाडगेबाबा यांची रांधून फेरी गावामधून काढण्यात आली. त्यानंतर भाषन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यानंतर दुपारला महिलाचां हळदि कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सायंकाळी सात वाजता. सामुदायिक प्रार्थनेच्या महत्वावर रवीभाऊ चौधरी यांनी मार्गदर्शन केले.व चौथ्या दिवशी सकाळी पाच वाजता सामुदायिक ध्यान व ध्यानाच्या महत्त्वावर रुपेश तितरे यांनी मार्गदर्शन केले. व त्यानंतर सोबतच सर्व भजनीं मंडळ सकाळी सात वाजता वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पालखीची भव्य शोभायात्रा यात्रा गावातून काढण्यात आली.नं.काल्याचे किर्तन ह.भ.प. श्री निलेश महाराज राऊत यांनी केले व त्यानंतर समाजातील अतुलनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा कार्यक्रमात सत्कार करण्यात आला यामध्ये सत्कारमूर्ती श्री.सुभाषराव राधाकिसनजी राठी, त्र्यंबकराव गुलाबराव गायकवाड, गजानन रमेशराव ‌फिरके, काशिनाथ मारोतराव वाळके, भावरावजी कांबळे, व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये चि.सत्यम अर्जुनराव हरणे, कु.कीर्तीका नरेंद्रराव जुनघरे,चि.जय अविनाश देशमुख यांचा यावेळी शाल व शील्ड देऊन सत्कार करण्यात. व नंतर लगेच भव्य असे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमात प्रमुख पाहुणे उपस्थिती श्री शैलेंद्र पंजाबराव मेटे, भाऊरावजी बगाडे, रवी भाऊ चौधरी, , ठाणेदार रामेश्वर धौंडगे, स्वाती शैलेंद्र मेटे, एस.के.जाधव, पंकज गायकवाड,मनोहरे मॅडम, मारोतराव सातपुते,अनिता मेश्राम, मीनाक्षी ठाकरे, विशाल ठाकरे, अनिल बगाडे, गजानन ‌फिरके, त्र्यंबकराव गायकवाड, राजु भेंडे, गोपाल भापकर, गिरीश भुतडा, गोपाल भूत, व आम्ही बालाजी फाउंडेशन धामणगाव रेल्वे,व नंतर पंकज गायकवाड , अनिल बगाडे, प्रकाशराव गुडधे,गजानन ‌फिरके, राजु ठोंबरे,विजय पाटील, विवेक गुडधे ,किरण गुडधे,अतुं तितरे,गुड्ड तितरे,राजु तितरे, गोपाल माळोदे,विलास हरणे, यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थ्यांना बक्षीस वितरित करण्यात आली.नंतर राष्ट्रवंदना घेऊन अध्यक्ष यांच्या वतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यामध्ये गावातील नागरिक व तरूण- तरुणांनीनी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शवला.

veer nayak

Google Ad