रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदासजी आठवले यांचे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागल्या मुळे धामणगावातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मिठाई वाटून आतिश बाजी करून जल्लोष साजरा केला. नगरपरिषद प्रांगणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून पूजन करून अभिवादन केले. सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी शुभेच्छा देत जल्लोष साजरा केला. यावेळीजिल्हा संघटक प्रशांत मुन ,शहर अध्यक्ष डॉ. पवन झटाले ,अल्पसंख्याक अध्यक्ष राजिक बेग,
तालुका संघटक रवि उर्फ दादू मेश्राम,युवा अध्यक्ष धिरज भैसारे ,सह तेजस महाजन,राजेन्द भरोसे ,तालुका अध्यक्ष विनायक ढाणके सह शोकडो रिपाइं आठवले चे कार्यकर्ते उपस्थित होते.