राष्ट्रीय ग्रंथालय दिवस साजरा”* स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये डॉ. एस .आर. रंगनाथन यांच्या जयंती निमित्य आयोजन

0
21
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे, १२ ऑगस्ट २०२४,

मा. श्री दत्ताजी मेघे बाल कल्याण शिक्षण संस्था द्वारा संचालित स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय ग्रंथालय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी रेड हाऊस तर्फे विशेष परिपाठाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या प्राचार्या प्रचिती धर्माधिकारी यांनी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पूजन केले. इयत्ता सहावीची विद्यार्थीनी कु.आराध्या मोहन करनाके हिने राष्ट्रीय ग्रंथालय व ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या कार्यावर महत्वपूर्ण माहिती दिली. यानिमित्त विद्यार्थी ग्रीष्मा गावंडे – वर्ग सहावी, देवश्री गिरी – वर्ग आठवी,प्रगती हरवानी – वर्ग सातवी, अरमान खान – वर्ग आठवी,सार्थक वानखडे – वर्ग सातवी इत्यादिंनी शाळेच्या वाचनालायला पुस्तके प्रदान केली. कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्रंथपाल प्रवीण टोंगे यांनी दिनांक १२ ऑगस्ट २०२४ ते १४ ऑगस्ट २०२४ पर्यंत बुक डोनेशन ड्राईव्ह चे आयोजित केले आहे. यात इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत चे विद्यार्थी मोठ्या संख्येने भाग घेतील. असा मानस व्यक्त करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्या प्रचिती धर्माधिकारी, आयोजन समिती, रेड हाऊस सदस्य व ग्रंथपाल प्रवीण टोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

veer nayak

Google Ad