धामणगाव रेल्वे:-
श्री दत्ताजी मेघे बाल कल्याण शिक्षण संस्था संचालित स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंत निमित्य मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता आणि विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या पूजनाने करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका के.साई नीरजा होत्या . मराठी शिक्षिका स्नेहा सोनटक्के , अश्विनी शेंडे आणि शिक्षिका मयुरी लांजेवार उपस्थित होते.या मराठी राजभाषा दिवसा निमित्ताने वर्ग पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी बडबड गीत गायन स्पर्धा , दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी कविता गायन तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धा वर्ग चौथी साठी एकांकिका स्पर्धा वर्ग पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर स्पर्धा वर्ग सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा वर्ग सातवी साठी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नाटिका स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या सर्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला अशा विद्यार्थ्यांना प्रणामपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गार्गी वाळबुदे आणि प्राप्ती सहारे हिने केले कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका के .साई नीरजा व मराठी शिक्षिका स्नेहा सोनटक्के , अश्विनी शेंडे आणि मयुरी लांजेवार आणि येलो हाऊस सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.