आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : सूर्यपुत्र भैय्यासाहेब तथा यशवंत आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिनांक १२ डिसेंबर २०२५ शुक्रवारला प्रियदर्शी राजा सम्राट अशोक बुद्ध विहार राणी लक्ष्मीबाई वार्ड आर्वी येथे जयंती समारोह कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला आर्वी शहरातील विविध मान्यवर व भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा आर्वीचे सर्व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आर्वी तालुकाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा माननीय मधुकररावजी सवाळे हे होते.
तर प्रमुख अतिथी भंतेजी धम्मरक्षित भीम टेकडी कौडण्यपूर व मदनराव गायकवाड, विकास मेश्राम ज्ञानेश्वरराव पाटील हे होते. भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक सुरेश भिवगडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली जयंती समारोह पार पडला. भारतीय बौद्ध महासभा वर्धा जिल्हा शाखेतर्फे घेण्यात आलेल्या धम्मज्ञान स्पर्धेत उत्तीर्ण झाल्यामुळे मयंक विकास मेश्राम याचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात आर्वी शहराची भारतीय बौद्ध महासभा महिला शाखा कार्यकारिणी निवडण्यात आली. सामाजिक कार्यकर्त्या भारतीताई बनसोड अध्यक्षपदी तर सरचिटणीसपदी युवा उद्योजिका प्रज्ञा विकास मेश्राम व कोषाध्यक्ष मीना बनसोड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सोबतच ललिताबाई चहांदे सुमन मदन गायकवाड रुक्मा ज्ञानेश्वर राव पाटील संगीता सुरेश मेश्राम प्रीती प्रवीण अधव अमिता अमोल काळबांडे शालू भगवंत मात्रे सविता दिलीप दवाळे मनोरमा रमेश काळबांडे ललिता मेश्राम वंदना मारुती काळबांडे बेबीबाई काशिनाथ सवाई देवकाबाई सौदागर वंदना सतीश पखाले, विना मंगेश काळबांडे सविता मनोज ढाणके सुप्रिया रामदास भोगे माया नरेंद्र डोंगरे , नीलिमा प्रमोद भगत, मयुरी राहुल काळबांडे विमल झाटे रंजना विनोद ढवळे निरूपमा भास्कर शिंगाडे सुशीला रामटेके , इत्यादी निवड करण्यात आली. आर्वी शहरातील सर्व धम्मप्रेमी उपासक उपासिकांनी या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते.















