धामणगाव रेल्वे
एम ओ सी कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटर नागपूर ,लायन्स क्लब धामणगाव एलाईट व माहेश्वरी नवयुवक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने मोफत कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन मीनी माहेश्वरी भवन येथे
दिनांक 14 सप्टेंबर शनिवारला दुपारी 11 ते तीन वाजेपर्यंत करण्यात आले आहे.
नागपूर येथील प्रसिद्ध कर्करोग तज्ञ डॉ. मकरंद रणदिवे व एम मो सी रिसर्च सेंटर यांची जम्मू या शिबिरात रुग्ण तपासणी करणार आहे. या शिबिरात स्तन कॅन्सर स्क्रीनिंग ,तोंडाचे कॅन्सर स्क्रीनिंग, बी एम आय ,रक्त तपासणी ,कम्प्लीट ब्लड काउंट इत्यादी चाचण्या निशुल्क करण्यात येणार आहेत. एम ओ सी रिसर्च सेंटर नागपूर येथे सर्व प्रकारच्या कर्करोगावर जागतिक दर्जाचे उपचार अत्यल्प शुल्कात केले जातात यात केमोथेरेपी टार्गेटेड थेरेपी इमिनोथेरपी हार्मोन थेरेपी इत्यादी चा समावेश आहे. अशा प्रकारचे शिबिर धामणगाव परिसरात प्रथमच होत असल्याने पंचक्रोशीतील संभाव्य रुग्णांनी या निशुल्क शिबिराचा लाभ घ्यावा अशी विनंती संयुजकांनी केली आहे शिबिराच्या यशस्वी ते करिता लायन्स क्लब धामणगाव एलाईट ,माहेश्वरी नवयुवक मंडळ व येंडे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे सदस्य प्रयत्नशील आहेत.