आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : स्थानिक आर्वी येथील गृह अर्थशास्त्र विभागाअंतर्गत एक दिवसीय ‘केक मेकिंग’ वर्कशॉप चे आयोजन करण्यात आले होते या वर्कशॉप चे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र सोनटक्के यांनी केले. या कार्यक्रमांमध्ये केकचे प्रशिक्षण अमरावती येथील सौ अश्विनी अनुप गुंबळे यांनी विविध प्रकारचे प्रात्यक्षिक करून मुलींना समजाऊन सांगितले कप केक, चॉकलेट केक, पायनॅपल केक, फ्रुट केक, विविध प्रकारचे आयसिंग शिकविण्यात आले तसेच या सारख्या उपक्रमातून विद्यार्थिनींना स्वयंरोजगार देखील प्राप्त करता येईल याबाबत मार्गदर्शन केले.

या वर्कशॉप चे आयोजन गृह अर्थशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. रोहिणी मेश्राम यांनी केले. तसेच डॉ. ज्योती देशमुख, प्रा. योगिता खेकाळे, प्रा. हर्षिता त्रिवेदी यांनी सहकार्य केले.
















