धामणगावरेल्वे – दाभाडा येथे बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला बैलपोळा हा सण शेतकऱ्यांसाठी अंत्यत उत्साहाचा असतो. हा दिवस बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा करतात. शेती मोठ्या प्रमाणात बैलांवर अवलंबून आहे
म्हणून एक दिवस ग्रामीण भागातील लोक पोळा साजरा करुन त्यांचे कौतुक करतात. या दिवशी बैलाची पूजा केली जाते त्याची मिरवणूक काढली जाते. दाभाडा गावातील बैलपोळ्यामध्ये एकूण 55 हून अधिक जोड्या होत्या यामध्ये सर्व बैल जोड्या सजवलेल्या होत्या त्यांच्या अंगावर झिल व शिंगावर बाशिंग आणि त्यांच्या अंगावर वेगवेगळे रंग आणि पायामध्ये घुंगरू अशा या बैलांना सजवण्यात आला त्यानंतर सर्व बैल जोड्या जिल्हा परिषद शाळा समोर सर्व शेतकऱ्यांनी बैल जोड्या आणल्या आणि या बैल जोड्यामध्ये सर्वप्रथम.. बैलांचा सन्मान करण्यात आला या पोळा उसामध्ये प्रदीप भेंडे पोलीस पाटील मुकुंद माहुरे ग्रामपंचायत सरपंच ग्रामपंचायत सदस्य संजय पनपालीया नंदू भाऊ कोकाटे राजेंद्र बुगल ओम कोरडे विनोदराव भेंडे अनुप भेंडे गणेश नेवारे नानाजी नेवारे अवधूत कुरमकार विलास उचके बबलू डबळे आकाश ठाकरे तुषार कोकाटे चेतन बुगल व गावातील नागरिक व ग्रामपंचायत सर्व सदस्य व पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थिती होते..