कावली वसाड
येथूनच जवळ असलेल्या दाभाडा येथील मानवता बौद्ध विहारातील बौद्ध बांधवांनी व लहान मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. धामणगाव रेल्वे तालुक्यात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये बौद्ध बांधवांनी पहिल्यांदा शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे लोक कल्याणकारी कार्य व त्यांच्या कार्याची गरज आज समाजाला असल्याचे प्रतिपादन शिवश्री गजानन भेंडे यांनी केले ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून नितीन टाले, प्रमुख पाहुणे गजानन भेंडे, सागर सोनटक्के, गजानन मानकर, किरण उईके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. हा कार्यक्रम मानवता बौद्ध विहारातील लहान मुलींनी आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा चे पूजन करून सुरुवात करण्यात आली.
त्यानंतर येथील बौद्ध बांधवांनी व लहान मुलांनी आपल्या वेगवेगळ्या वेशभूषा करून इतरांची मने जिंकली यावेळी लहान मुलांनी आपली विचार यावेळी व्यक्त केले या बौद्ध समाजातील लहान मुलांनी आपले विचार शिवाजी महाराजांच्या जीवनावर अनेकांनी प्रकाश टाकला.
यावेळी बोलताना प्रमुख पाहुण्यांनी आपले मार्गदर्शन करतेवेळी महाराष्ट्राच्या इतिहासात नव्हे तर भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने बौद्धांनी यावर्षी पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तालुक्यात साजरी केली हा इतिहास लिहिला जाईल अशी प्रतिक्रिया प्रमुख पाहुण्यांनी यावेळी बोलताना केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. कांबळे हिने तर आभार प्रदर्शन आचल स्थूल हिने मानले या कार्यक्रमाला गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते हे मात्र विशेष..