लाडक्या बहिणी सोबत संवाद साधताना त्यांच्याशी हितगुज करताना त्यांच्या अडचणी समजून घेताना अलगद मागणं आवाज येतो “मामा” मागणं आलेला आवाज मामा म्हणून घातलेली प्रेमळ साद आणि त्या संवादामध्ये मामा मला शाळेतून यायला अडचण होते चांदुर रेल्वे वरून येताना बस च्या फेऱ्या खूप कमी आहे. त्यामुळे आमच्या बस फेऱ्या वाढवून द्या. हे मामा भाचीच नातं अलगद मन जिंकून जात, या पद्धतीने या नेतृत्वाला स्वीकारत दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांच्या प्रेमळ स्वभावावर प्रभावित होत आज आमदार प्रतापदादा अडसड यांची जनसामान्यांमध्ये असलेली सामान्य व्यक्तिमत्त्वाची ओळख या मामा भाचीच्या नात्यावरनं निदर्शनास येते.
नेतृत्व लोकप्रतिनिधी म्हटलं की त्यांच्यापर्यंत पोहचायला त्यांच्याशी संवाद साधायला आपल्या समस्या त्यांच्यापाशी मांडायला सामान्य लोकांना अनेक अडचणी आल्याचे राजकीय पटलावर अनेक उदाहरणं आहेत. परंतु आमदार प्रतापदादा अडसड यांच्या बाबतीत हे दिसून येत नाही. ज्या पद्धतीने आमदार प्रतापदादा अडसड यांच्याशी संवाद साधायला ही एक छोटी मुलगी पुढे सरसावली यातूनच दादा आणि जनता यातील निर्मळ नातं, प्रेम, विश्वास त्यांच्या अधिकाराचा हक्काचा आमदार, भाऊ, मुलगा, मामा असं प्रत्येक नातं आपसूक पुढं येत.