क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज यांचा जन्म दिनांक

0
18
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज यांचा जन्म दिनांक १५ फेब्रुवारी १७३९ रोजी बंजारा कुटूंबात मध्ये आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुठी तालुक्यातील गोलाल डोडी गावात झाला. आता या गावाला सेवागड या नावाने ओळखले जाते.

बंजारा समाजातील समाजसुधारक संत सेवालाल महाराज याचे कार्य फक्त बंजारा समाजसाठीच नव्हे तर समस्थ मानवजातीला प्रेरित करतील असे आहे.बंजारा समाजातील युगपुरुष सेवालाल महाराज गोर बंजारा जमाती मध्ये हे मोठे संत होऊन गेले.

जगातील अनेक परंपरा त्यांनी भारतात आणल्या त्याच बरोबर भव्य संस्कृतीचे दर्शन जगभर घडविले आज हि बंजारा समाज मध्ये एक पेहराव आणि एक भाषा टिकून आहे…

से.फ.ला.हायस्कूल धामणगाव- रेल्वे जिल्हा-अमरावतीचे कला शिक्षक -चित्रकार अजय जिरापुरे यांनी संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त विद्यालयाच्या दर्शनी फलकावर रेखाटन करून विनम्र अभिवादन केले आहेत ..

veer nayak

Google Ad